शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

भाजपकडून माढ्यात सर्व शासकीय ताकद खर्ची : संजय शिंदेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:08 IST

भाजपचे नेते आता संजयमामांना बघून घेतो, त्यांची चौकशी करतो, अशा पोकळ धमक्या देत आहेत. अशा पोकळ धमक्यांना घाबरणाºयांपैकी मी नाही : संजय शिंदे

ठळक मुद्देभाजपने मला उमेदवारी घ्या अन्यथा निवडणूक लढवू नका, असा दबाव टाकला होता - संजय शिंदेमाझ्यावर राष्ट्रवादीच्या विचाराचा पगडा असल्याने मी पक्षाचा उमेदवार झालो - संजय शिंदेसरकार सत्तेच्या जीवावर, जनशक्तीच्या जोरावर काहीही करु लागले आहे - संजय शिंदे

सांगोला : भाजपचे नेते माढा लोकसभा मतदारसंघासाठी सर्व शासकीय ताकद खर्ची टाकायला लागले का? असे मला वाटायला लागले असल्याची टीका संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

 सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतील नेतेमंडळीचे आपले जमत नसल्यामुळे काहीकाळ पक्षापासून दुरावलो होतो; मात्र मी दुसºया कोणत्याच राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. राष्ट्रवादीच्या विचाराचा मी एक कार्यकर्ता असून भाजपच्या दबावतंत्राला जुमानणाºयांपैकी मी नाही. त्यामुळे भाजपचे नेते आता संजयमामांना बघून घेतो, त्यांची चौकशी करतो, अशा पोकळ धमक्या देत आहेत. अशा पोकळ धमक्यांना घाबरणाºयांपैकी मी नसल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.

संजय शिंदे म्हणाले, आतापर्यंत भाजपने प्रवेश करणाºयांपैकी ८ ते १० जणांना राज्यसभा, काहींना विधानपरिषद, राज्यपाल व राज्यमंत्री पदाचे वाटप केले आहे. आज माझ्यासोबतची जी मंडळी भाजपमध्ये गेली आहे ती मनाने गेली नाही तर सत्तेच्या दबावापोटी त्यांच्यासोबत गेली आहेत. 

भाजपने मला उमेदवारी घ्या अन्यथा निवडणूक लढवू नका, असा दबाव टाकला होता, परंतु एकदा घेतलेल्या निर्णयावर मी ठाम असतो. खरेतर मी लोकसभेला इच्छुक नव्हतो त्यावेळेला भाजपने तुम्ही उमेदवार होणार नसेल तर आम्ही मोहिते-पाटील यांचा प्रवेश करून त्यांना उमेदवारी देतो असा अल्टीमेट देऊन निर्णय कळविण्याचे सांगितले होते, परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. माझ्यावर राष्ट्रवादीच्या विचाराचा पगडा असल्याने मी पक्षाचा उमेदवार झालो आहे. सरकार सत्तेच्या जीवावर, जनशक्तीच्या जोरावर काहीही करु लागले आहे, परंतु ते लोकसत्तेपुढे टिकणार नाही. आतापर्यंत अनेकजणांनी बघून घेतो म्हणाल्यामुळेच मी मोठा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे म्हणाले, आधी तुम्ही जनतेतून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवा मगच शरद पवार यांच्याविषयी बोला, असा थेट इशारा देऊन ज्यांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढवता आली नाही ते शरद पवार यांच्यावर टीका करतात. त्यांनी अगोदर निवडणूक लढवावी मगच पवार यांच्याविषयी बोलावे अशी उपरोक्त टीका चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे,  नाथा जाधव, चंद्रकांत चौगुले उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाधाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटील