शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

भाजपा आमदारांसह पंढरपूर मंदिर समितीच्या सदस्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 13:15 IST

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई; संचारबंदी काळात विठ्ठलाची पूजा करणे पडलं महागात...!

ठळक मुद्देसंचारबंदी काळात विठ्ठलाची पूजा करणे पडलं महागातपंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर : संचार बंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, अधिनियमाचे साथी रोग प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई पंढरपुरात करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य तथा भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर व  शिवसेनेच्या कोट्यातून झालेले मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशासह राज्यामध्ये संचारबंदी लागू आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन भाविकासाठी बंद करण्यात आले आहे. असे असतानाही कोरोना साथीचा रोगाचा प्रादुर्भाव लक्षात न घेता भाजपचे आमदार सुजितसिंह मानसिंह ठाकूर (रा. उस्मानाबाद) व त्यांच्या पत्नी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे संभाजी शिंदे (राहणार भाळवणी तालुका पंढरपूर) व त्यांच्या पत्नी यांनी चैत्र यात्रेनिमित्त सकाळी साडेपाच ते साडेचार वाजण्याच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा-अर्चा केली. 

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर येथे एकत्र जमून कोरोना विषाणूचा संसर्ग फैलवण्याचा धोका आहे. याची जाणीव असतानासुद्धा श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजाअर्चा केली. म्हणून वरील सर्वांविरुद्ध भा.द.वि.का. क. २६९,२७०,१८८ तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब), व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(३)/१३५ तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम २,३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरCrime Newsगुन्हेगारीPandharpurपंढरपूर