शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने मारली जोरदार मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 4:32 PM

सोलापूर लोकसभा निवडणुक ; जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना मिळाले ३९ हजारांचे मताधिक्य

ठळक मुद्देकाँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जातेमाजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात चांगलाच फटका बसलाभाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना या मतदारसंघातून ३९,५०८ इतके मताधिक्य मिळाले

राजकुमार सारोळे

सोलापूर : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या दुसºयांदा प्रतिनिधीत्व करीत असताना भाजपने चांगलीच आघाडी घेतली.

नरेंद्र मोदींच्या लाटेचा फटका बसणार नाही असा विश्वास बाळगणारे काँग्रेसचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात चांगलाच फटका बसला. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया या मतदारसंघात त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे या दुसºयांदा प्रतिनिधीत्व करीत असताना  भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना या मतदारसंघातून ३९,५०८ इतके मताधिक्य मिळाले आहे. 

    काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक़ प्रचारात हा मतदारसंघ पिंजून काढला. विविध कामांतून आमदार शिंदे यांनी मतदारांशी सतत संपर्क ठेवला. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला तारेल असा सर्वांना विश्वास होता. विशेष बाब म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे  पण सेना व भाजप नगरसेवकांनी मिळून काम केल्याचा चांगला परिणाम दिसून आला. भाजपपेक्षा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झाल्या. पण या मतदारसंघातील राजकीय स्थित्यंतरामुळे मतदारांनी भाजपकडे कौल दिल्याचे दिसून येत आहे. 

    माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याही या मतदारसंघात प्रचार सभा झाल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, सिनेअभिनेत्री विजयाशांती, मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या सभा झाल्या. या सभांना झालेली गर्दी मतात परिवर्तीत होऊ न शकल्याचे चित्र दिसत आहे.

      या मतदारसंघातील प्रचाराची सर्व यंत्रणा स्वत: आमदार प्रणिती शिंदे यांनी हाती घेतली होती. त्यादृष्टीने त्यांनी नियोजन केले. गृहभेटीवर भर दिला. मोदी सरकारची नोटबंदी, त्यामुळे वाढलेली बेकारी, कामगारांच्या प्रश्नांवर जोर दिला. याचबरोबरीने शहरातील स्थानिक प्रश्नाने मतदारांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील पाणीटंचाई, महापालिकेत भाजप सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी विकासकामांकडे झालेले दुर्लक्ष याकडे मतदारांचे लक्ष वेधले. पण तरीही मतदारांनी या प्रश्नांकडे  लक्ष न देता भाजपला चांगलीच साथ दिल्याचे मतदानावरून दिसून येत आहे. 

या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणाम२00९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांना या मतदारसंघातून ४६ हजार ३८२ तर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना ५९ हजार ८३९ हजार मते मिळाली होती. शिंदे यांना या मतदारसंघातून १३ हजार ४५७ मतांचे मताधिक्य मिळाले होते. पण यावेळेस शिंदे यांच्या मतामध्ये घट होऊन भाजपचे मताधिक्य वाढले आहे. हा मतदारसंघ भाजप-सेना युती कायम राहिली तर शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच भाजप-शिवसेना नगरसेवकांनी एकत्रितपणे काम केल्यास बदल होण्याची शक्यता आहे. याचे संकेत मिळाल्याने शिवसेनेच्या गोटात जल्लोष करण्यात येत आहे . 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे