गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची करमाळा भाजपाकडून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:58+5:302021-03-22T04:20:58+5:30

करमाळा : शंभर कोटी रुपये मागणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश ...

BJP demands expulsion of Home Minister | गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची करमाळा भाजपाकडून मागणी

गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची करमाळा भाजपाकडून मागणी

करमाळा : शंभर कोटी रुपये मागणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असे विधान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केली आहे.

चिवटे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, तालुका चिटणीस आजिनाथ सुरवसे, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, शरद कोकीळ, लक्ष्मण काळे, गणेश गोसावी, अशोक सावंत, हर्षद गाडे, प्रसाद गेंड उपस्थित होते.

----

२१ करमाळा बीजेपी

गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी निवेदनाद्वारे करताना भाजपाचे पदाधिकारी.

Web Title: BJP demands expulsion of Home Minister