शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील अकरा पैकी दहा पंचायत समितीवर भाजपाचा सभापती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:27 IST

सभापती पदावर भाजपचे वर्चस्व असले तरी उपसभापती पदाच्या वाटपात वैविध्य दिसून येते.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीची निवडणूक प्रक्रिया गुरूवारी पार पडली. दरम्यान, यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. जिल्ह्यातील ११ पैकी १० पंचायत समितीमध्ये भाजपाचे सभापती विजयी झाले आहेत. तर केवळ एका जागेवर शिवसेनेला यश मिळाले आहे.

या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासूनच आपली रणनीती चोख ठेवली होती. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माढा आणि करमाळा या १० तालुक्यांत भाजपचे सभापती विराजमान झाले आहेत. माळशिरसमध्ये मात्र शिवसेनेच्या दत्ता मगर यांनी सभापतीपद पटकावत शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. या निवडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना मिळालेले प्रतिनिधित्व. जिल्ह्यातील ११ पैकी ६ तालुक्यांचे नेतृत्व महिला सभापतींकडे सोपवण्यात आले आहे. उत्तर सोलापूर (तेजस्विनी बोराडे), अक्कलकोट (रश्मी हिप्परगी), बार्शी (मिनाक्षी रोंगे), मंगळवेढा (दिपाली ताड), सांगोला (पुनम इंगवले) आणि करमाळा (पुजा ढेरे) या ठिकाणी महिलांनी बाजी मारली आहे. सोलापूरच्या ग्रामीण राजकारणात भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महिलांना मिळालेले झुकते माप पाहता, आगामी काळात ग्रामीण विकासाच्या कामात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरेल, अशी चिन्हे आहेत.

सभापती पदावर भाजपचे वर्चस्व असले तरी उपसभापती पदाच्या वाटपात वैविध्य दिसून येते. येथे भाजपने ६ जागा राखल्या आहेत, तर उर्वरित ५ जागांवर शिवसेना (१), राष्ट्रवादी शरद पवार गट (२), राष्ट्रवादी अजित पवार गट (१) आणि एका अपक्ष उमेदवाराला संधी मिळाली आहे. हे चित्र पाहता स्थानिक पातळीवर सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याचे स्पष्ट होते.

तालुकानिहाय सभापती व उपसभापतीउत्तर सोलापूरसभापती-सौ.तेजस्विनी बोराडे,भाजपउपसभापती -सुनिल भोसले,भाजप

दक्षिण सोलापूर सभापती-संदीप टेळे, भाजप उपसभापती -सौ.वर्षा पटणे,भाजप

अक्कलकोट सभापती -रश्मी हिप्परगी भाजप उपसभापती - सागर कल्याणशेट्टी, भाजप 

बार्शी सभापती-मिनाक्षी रोंगे,भाजपउपसभापती -संतोष निंबाळकर,भाजप

मोहोळ सभापती -अल्लम चौधरी,भाजपउपसभापती -उल्का पाटील,भाजप

मंगळवेढा सभापती -दिपाली ताड भाजपउपसभापती-अर्जन मल्लाळे,भाजप

सांगोला सभापती -पुनम इंगवले,भाजपउपसभापती -अजय सरगर, शिवसेना 

पंढरपूर सभापती-डॉ.शुभम आगवणे,भाजपउपसभापती -प्रमोद देशमुख, राष्ट्रवादी 

माढासभापती-पंडीतराव देशमुख,भाजपउपसभापती -स्वाती गिड्डे,अपक्ष

माळशिरस सभापती-दत्ता मगर, शिवसेना उपसभापती -सोनाली पाटील, राष्ट्रवादी श.प.

करमाळा सभापती -पुजा ढेरे, भाजप उपसभापती -अजित विध्ने, राष्ट्रवादी अ.प.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Solapur Panchayat Samiti Elections, Secures Ten Chairmanships

Web Summary : BJP secured victory in ten out of eleven Panchayat Samitis in Solapur district. Shiv Sena won one. Women lead six Talukas. BJP dominates, but deputy chair positions reflect diverse political affiliations, including Shiv Sena, NCP, and independents.
टॅग्स :BJPभाजपा