शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भाजप सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचारात वाढ, सुशिलकुमार शिंदे यांची भाजप सरकारवर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:42 IST

सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे  चार हुतात्मा पुतळ्याजवळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आले.

ठळक मुद्देजातीय हिंसाचाराला भाजप सरकारचा छुपा पाठिंबा - सुशीलकुमार शिंदेभारताची वाटचाल लोकशाहीवरून हुकूमशाहीकडे सुरू - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : भाजप सरकार केंद्र व राज्यात आल्यापासून जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकाचा आवाज दाबला जात आहे व त्यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. जातीय हिंसाचाराला भाजप सरकारचा छुपा पाठिंबा आहे. भारताची वाटचाल लोकशाहीवरून हुकूमशाहीकडे सुरू आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी येथे बोलताना केली. 

सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे  चार हुतात्मा पुतळ्याजवळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यामध्ये आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार भारत भालके, आमदार रामहरी रुपनर, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, दिलीप माने, प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी खासदार धर्मण्णा सादूल, राजशेखर शिवदारे, दत्ता सुरवसे, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, महिला जिल्हा अध्यक्ष इंदुमती अलगोंडा पाटील, शहर महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर,चंद्रकांत दायमा, पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, लोकसभा युवक अध्यक्ष सुदीप चाकोते, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, नगरसेवक चेतन नरोटे, नरसिंग कोळी, बाबा मिस्त्री, तौफिक हत्तुरे, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे,  नगरसेविका श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे, अनुराधा काटकर, फिरदोस पटेल, परवीन इनामदार, माजी महापौर सुशीला आबुटे, अलका राठोड, नलिनी चंदेले, शिवाजी काळुंगे, गौरव खरात, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, भीमाशंकर जमादार, लक्ष्मण भोसले, संजय हेमगड्डी, अशफाक, बळोरगी, केदार उंबरजे, अशोक कलशेट्टी, सिद्धाराम चाकोते आदी सहभागी झाले होते. स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास व देशासाठी बलिदान दिलेल्या चार हुतात्म्यांना अभिवादन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली. 

यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे.देशात सामाजिक सलोखा, शांतता, बंधुत्व नांदावे या यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे त्यासाठीच आज देशभर अशाप्रकारे उपोषण करण्यात येत आहे. उपोषण ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे  शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, सिद्धेश्वर देवस्थानचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. उपोषणात शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सहकारमंत्र्यांची भेटकाँग्रेसचे भाजप सरकारविरोधात उपोषण सुरू असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख हे पार्क स्टेडियममध्ये एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यांचा ताफा पाहून काँग्रेस कार्यकर्ते उभे राहिले. त्यावेळी ते कार्यक्रमस्थळाकडे जाऊ लागल्यावर कार्यकर्त्यांनी आम्हाला तुम्ही आमच्याकडेच आलात का असे वाटले अशी प्रतिक्रिया देशमुख यांना दिली. थांबा हा कार्यक्रम करून तुमच्याकडेही येतो असे म्हणून ते कार्यक्रमाकडे गेले. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी उपोषणाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावर सहकारमंत्री देशमुख यांनी तुमच्या भावना शासनाकडे कळवितो असे आश्वासन दिले. यानंतर सहकारमंत्री देशमुख यांच्या या अनपेक्षित भेटीची चर्चा सर्वत्र रंगली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसSubhash Deshmukhसुभाष देशमुख