जन्मदात्या आईनंच केला प्रियकराच्या मदतीनं खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:17 IST2020-12-27T04:17:11+5:302020-12-27T04:17:11+5:30

२४ डिसेंबर रोजी रात्री ११ ते २५ रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान परितेवाडी येथील सिद्धेश्वर सुभाष जाधव (वय २२) ...

The birth mother committed the murder with the help of her boyfriend | जन्मदात्या आईनंच केला प्रियकराच्या मदतीनं खून

जन्मदात्या आईनंच केला प्रियकराच्या मदतीनं खून

२४ डिसेंबर रोजी रात्री ११ ते २५ रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान परितेवाडी येथील सिद्धेश्वर सुभाष जाधव (वय २२) याचा खून करून प्रेत परितेवाडी हद्दीतील माळावर टाकले होते. पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुलाच्या आईस ताब्यात घेऊन चौकशी चालू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. मुक्ताबाई सुभाष जाधव (वय ४५, रा. परितेवाडी) असे अटक केलेल्या आईचे नाव असून, प्रियकर तात्यासाहेब महादेव कदम (रा. परितेवाडी) हा घटना घडल्यापासून फरार आहे.

पोलीस सूत्रांनुसार सिद्धेश्वर जाधव याचा लहान भाऊ बालाजी सुभाष जाधव (वय १९) याने पोलीस तपासात पोलिसांना सांगितले की, मुक्ताबाई व तात्यासाहेब कदम यांच्यात असलेल्या संबंधास सिद्धेश्वर हा अडथळा ठरत होता. तसेच आमची जमीन हडप करण्याचा तात्यासाहेबाचा डाव होता. त्याला सिद्धेश्वर विरोध करत होता. त्यामुळे संगनमत करून सिद्धेश्वर यास झोपलेल्या ठिकाणीच ठार मारून त्याचे प्रेत माळरानावर एका चारीत टाकले. मुक्ताबाईनेही चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

----लहान मुलाचे वास्तव्य हॉटेलमध्ये

आरोपी तात्यासाहेब कदम याने त्याची पत्नी व मुले यांना काही महिन्यांपूर्वी पत्नीच्या माहेरी पाठवून देऊन तो मुक्ताबाई व सिद्धेश्वर यांच्यासोबत परितेवाडीत राहत होता. त्याला सिद्धेश्वरचा विरोध होता. छोटा मुलगा बालाजी यास हे पसंत नसल्याने तो घरी न येता वरवडे येथील एका हॉटेलमध्ये काम करून तिकडेच राहत होता.

-----पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

गुरुवारी रात्री सिद्धेश्वर झोपलेल्या ठिकाणीच मुक्‍ताबाई व तात्या कदम यांनी ठार केले. प्रेत माळावरील चारीत नेऊन टाकले. मुक्ताबाईने घरासमोर जिथे रक्त सांडले होते, ती जागा शेणाने सारवून काढली होती. सिद्धेश्वर झोपलेल्या ठिकाणचे रक्ताने माखलेले कपडेही घरासमोरच काही अंतरावर जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

----

फोटो :-२६ सिद्धेश्वर जाधव, मयत

Web Title: The birth mother committed the murder with the help of her boyfriend