शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्याजवळ पक्ष्यांची शिकार; संशयित दोघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:03 IST

वनकर्मचाऱ्यांची कारवाई; २ मृत मोर, ६ लांडोर, २ तितर पक्षीसह शिकारीसाठीचे साहित्य हस्तगत

सांगोला :  लाॅकडाऊनच्या कालावधीत शासकीय अधिकारी, कर्मचारी आपआपल्या कर्तव्यात व्यस्त असताना गोपनीय खबरीच्या आधारे वन कर्मचाऱ्यांनी संशयित दोघांना ताब्यात घेऊन घटनास्थळावरून मृत २ मोर, ६ लांडोरसह २ तितर पक्षी, ५० ग्रॅम मका बियाणे, विळा, पक्षी पकडण्याचे जाळे , दुचाकी असे साहित्य हस्तगत केले. ही घटना बुधवार २० रोजी दु. २ च्या सुमारास सांगोला येथील बनकर मळा याठिकाणी उघडकीस आली आहे.

दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी संशयित दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.वनपरिक्षेत्र कार्यालय वनपाल एस जे शिंदे व वनरक्षक डी. एस देवकरसह इतर कर्मचाऱ्यांनी गोपनीय खबरीच्या आधारे बुधवार २० रोजी दु. २ च्या सुमारास सांगोला ( बनकर मळा ) येथे समक्ष जागेवर जाऊन चौकशी व शोध घेतला असता २ मोर , ६ लांडोर, २ तितर मृतावस्थेत आढळून आले. सदर क्षेत्रावर पायाच्या साह्याने रेष ओढून त्यावरती मक्याचे बी पडलेले आढळून आले .सदर ठिकाणी कर्मचारी पाहणी करीत असताना अशोक आप्पा चव्हाण व तानाजी शिवा चव्हाण (रा. संजय नगर झोपडपट्टी , सांगोला) यांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून पक्षी पकडण्यासाठी तीन जाळे , एक विळा, ५० ग्राम. मका बियाणे व एमएच १३ डब्ल्यू ४४५३ एक दुचाकी हस्तगत केली. सदरचा गुन्हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलमान्वये नोंद करण्यात आला तसेच मृत मोर व लांडोर पक्षाना वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांचेकडून शवविच्छेदन करून घेतले. सदर गुन्ह्याची चौकशी उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार २१ रोजी सहा. वनसंरक्षक आर .एन .नागटिळक व वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.डी. बाठे यांनी कर्मचारी समवेत ( बनकर मळा ) सांगोला येथे जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून स्थानिक स्थळाचा पंचनामा केला. सदर आरोपीचे जाब, जबाब नोंद करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही डी बाठे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी