शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बाईकचोर अंड्या वडतिलेची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी

By विलास जळकोटकर | Updated: May 25, 2024 18:29 IST

एमपीडीए अन्वये स्थानबद्ध; बेकायदा जमाव जमवून मारपीट करायचा

सोलापूर : बेकायदेशीर जमाव जमवून दहशत पसरवरुन कोणालाही मारपीट करायचा. आर्थिक फायद्यासाठी घातक शस्त्र दाखवून धमकावणे, बाईक चोऱ्या अशा गंभीर स्वरुपाचे १८ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले (वय- २५, रा. मराठा वस्ती, सोलापूर) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याची शनिवारी पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. शहरातील नागिरकांचे जनजीवन विस्कळीत करुन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणण्याचे काम आरोपी आकाश वडितिले याच्याकडे होत होते.

गेल्या काही वर्षांपासून तो घातक शस्त्राचा धाक दाखवून मोटारयसाकल चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे तो करीत होता. त्याच्या गुन्हेगारी कारवायांबद्दल व्यापारी, सर्वसामान्य नागिरक उघडपणे पोलिसांना माहिती देण्यासही धजावत नव्हते. त्याच्या या कृत्याला लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या आदेशानुसार एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे अरविंद माने, विशेंद्रसिंग बायस यांच्यासह पथकातील अंमलदारांनी केली. तडीपार आदेशाचाही भंगआकाश उर्फ अंड्या वडितिले याला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन २०१३ व २०१५ मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपारीची व २०२१ मध्ये एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. अखेर त्याची शनिवारी स्थानबद्ध कारवाई करुन त्याला येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी