शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार

By दिपक दुपारगुडे | Updated: December 24, 2023 18:52 IST

बार्शी-धाराशिव मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेल्या उसाच्या ट्राॅलीला पाठीमागून दुचाकीची जोरदार धडक बसली.

सोलापूर : बार्शी-धाराशिव मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेल्या उसाच्या ट्राॅलीला पाठीमागून दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना २४ डिसेंबर रोजी सकाळी बार्शी-धाराशिव रस्त्यावर तांदूळवाडी (ता. बार्शी) येथून ७०० मीटर अंतरावर घडली.

तीन दिवसांपूर्वीच (ता. २१) याच परिसरात बस-दुचाकी अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही दुसरी घटना घडल्याचे हळहळ व्यक्त होत आहे. अमीर मुबारक सय्यद (वय २८, रा. ख्याजानगर, बार्शी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोहेल शकील खान (वय २०, बार्शी) जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, अमीर मुबारक सय्यद व सोहेल शकील खान हे दोघे धाराशिव येथील मामाकडे मुक्कामी थांबून सकाळी पाच वाजता दुचाकीवरून (क्रमांक एमएच १३-ईजी ७०३३) बार्शीकडे जात होते. तांदूळवाडीपासून ७०० मीटर अंतरावर आले असता, रस्त्याच्या मध्यभागी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या (क्रमांक एमएच १३-एजे ५९६१) पाठीमागील ट्रॉलीला पाठीमागून त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यात अमीर सय्यद गंभीर जखमी झाल्याने १०८ च्या रुग्णवाहिकेने पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. याबाबत तपास पोहेकाॅ शब्बीर शेख करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू