सोलापूर जिल्हा परिषदेत मोठी भरती; १७ पदांसाठी ६७४ जागांवर जॉबची संधी
By शीतलकुमार कांबळे | Updated: August 5, 2023 16:08 IST2023-08-05T16:07:43+5:302023-08-05T16:08:00+5:30
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात : २५ ऑगस्ट अंतिम मुदत

सोलापूर जिल्हा परिषदेत मोठी भरती; १७ पदांसाठी ६७४ जागांवर जॉबची संधी
सोलापूर : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सोलापूर जिल्हा परिषदेत गट-क मधील सरळसेवा भरती होणार आहे. १७ पदांसाठी ६७४ जागांवर तरुणांना जॉबची संधी मिळणार आहे. मोठ्या अंतरानंतर भरती होणार असल्याने अर्ज करणाऱ्या उमेदवरांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील १०० टक्के पदे भरण्यात येणार आहे. तर इतर विभागाकडील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीमार्फत करण्यात येत आहे. परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज सादर करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पदाचे नाव व पदसंख्या
आरोग्य पर्यवेक्षक पुरुष (३३), आरोग्य सेवक (हंगामी फवारणी क्षेत्र) (६४), आरोग्य परिचारिका (३००), औषध निर्माण अधिकारी (१९), कंत्राटी ग्रामसेवक (७४), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.) (३४), कनिष्ठ आरेखक (२), कनिष्ठ यांत्रिकी (१), कनिष्ठ लेखाधिकारी (१), कनिष्ठ सहाय्यक (३१), मुख्य सेविका / पर्यवेक्षिका (६), पशुधन पर्यवेक्षक (३०), लघुलेखक (१), वरिष्ठ सहाय्यक (५), वरिष्ठ सहाय्यक लेखा (४), विस्तार अधिकारी शिक्षण (७), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (६२)
ऑनलाईन अर्जाचे वेळापत्रक
नोंदणीस सुरुवात - पाच ऑगस्ट
अर्ज करण्याची अंतिम तारीख - २५ ऑगस्ट
शुल्क भरण्याची अंतिम तारीख - २५ ऑगस्ट
ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख - परीक्षेच्या सात दिवस आधी