शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; खबर मिळताच टीम धडकली गावात अन् वाचविलं दोन मुलींचा बालविवाह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 09:30 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथे होणारे दोन बालविवाह बालकल्याण विभागाच्या बालविवाह पथकाने आज गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास रोखले. 

चडचण (राज्य - कर्नाटक) येथील एका १७ वर्षीय बालिकेचा विवाह गुप्त पद्धतीने पहाटे ५ वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथील युवकाशी होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन १०९८ द्वारे जिल्हा बाल संरक्षण कक्षास मिळाली.  गोपनीय माहितीच्या आधारे मंद्रुप ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन थेटे, पोलीस नाईक प्रदीप बनसोडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल आर. एस. शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, आर. यू. लोंढे यांचे पथक पहाटे ४.३० वाजता होनमुर्गीच्या दिशेने रवाना झाले. विवाहस्थळी तत्परतेने पोहोचून होत असलेला बालविवाह रोखण्यात पथकास यश आले.हे पथक विवाहस्थळी पोहोचले असता १७ वर्षीय बालिकेचा विवाह होत असतानाच तिच्याच १६ वर्षीय चुलत बहिणीचाही बालविवाह होत असल्याचे चौकशीअंति पथकास निदर्शनास आले. बालिकांचा विवाह त्यांच्या नात्यातील युवकांशी होणार होता. हा बालविवाह बालविवाह प्रतिबंधक पथकाने थांबवून दोन बालिकांना बाल कल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर हजर केले असता बालकल्याण समितीने बालिकांची बालगृहात रवानगी केली. हा बालविवाह रोखण्याबाबतची यशस्वी कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस