शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबरला मंगळेवढ्यात

By appasaheb.patil | Updated: September 14, 2022 16:18 IST

मंगळवेढ्याच्या कदम गुरुजी महाविद्यालयात होणार युवा महोत्सव !

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा अठरावा युवा महोत्सव दि. ७ ते १० ऑक्टोबर २०२२ दरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून युवा महोत्सवाच्या यजमानपदासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाकडून युवा महोत्सव घेण्यासाठी प्रस्ताव आले होते. त्यानुसार समितीने संबंधित महाविद्यालयास भेट देऊन यंदाच्या महोत्सवाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

कोरोनामुळे गतवर्षीचा युवा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने पार पडला. त्यापूर्वीचा महोत्सव कोरोनामुळे रद्द झालेला होता. आता दोन वर्षाच्या कालावधीनंतर ऑफलाइन पद्धतीने युवा महोत्सव होणार आहे. त्यामुळे भारतीय विश्वविद्यालय संघाकडून प्राप्त सूचनेनुसार काही बदल यंदाच्या वर्षीसाठी करण्यात आले आहेत. या वर्षासाठी युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी युवा विद्यार्थी कलाकारांची वयोमर्यादा २५ वर्षावरून २७ इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन संघ व्यवस्थापक, तीन व्यावसायिक साथीदार आणि विद्यार्थी मिळून एकूण ४९ जणांच्या संघाची प्रवेशिका यंदा स्वीकारली जाणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षापासून युवा महोत्सवात कथाकथन आणि काव्यवाचन या कलाप्रकारांचा समावेश करण्यात आल्याचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी सांगितले. त्यानुसार आता युवा महोत्सवात एकूण २९ कलाप्रकारांचे सादरीकरण पहावयास मिळणार आहे.

विद्यार्थी कलाकारांनो तयारीला लागा; कुलगुरू डॉ. फडणवीस यांचे आवाहनयुवा विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील सृजनरंगाला एक हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यार्थी कलाकारांचा देखील मोठा प्रतिसाद दरवर्षी युवा महोत्सवाला लाभतो. त्यामुळे हा युवा महोत्सव अधिकाधिक दर्जेदार होत आहे. संलग्नित महाविद्यालयातील युवा विद्यार्थी कलाकारांनी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची व संघाची प्रवेशिका देणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरEducationशिक्षण