शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; निरा नदीने पाण्याची पातळी ओलांडली; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 16:35 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

अकलूज : तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर निरा खो-यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने वीर, भाटघर, निरा, देवघर व गुंजवणी या धरणातील पाण्याची पातळी वाढत असून आज मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास वीर धरणाचे गेट क्र.५ साडे चार फुट उचलून नीरा नदीत ४ हजार ६३७ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, तर उजवा कालव्याच्या विद्युतगृहातुन ८०० क्युसेक व डाव्या कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेस असे १ हजार १०० व धरणातून ४ ६३७ क्युसेक असा एकुण ५ हजार ७३७ क्युसेक इतका पाणी विसर्ग निरा नदीत सुरु झाल्याने वीर धरण प्रशासनाने निरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जुन व जुलै महिन्यातील पहीला आठवड्यापर्यत पावसाने दडी मारल्यानंतर गत महिन्यात निरा खो-यात ६ जुलैला पावसाला प्रारंभ झाला होता. निरा खो-यातील वीर, भाटघर, निरा-देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. १५ जुलै रोजी वीर धरण ९२ टक्के भरल्यानंतर धरणातुन निरा नदीत टप्प्याने पाणी सोडण्यात आले होते, त्यानंतर १९ जुलैला पावसाचा जोर ओसरल्याने निरा नदीत पाणी सोडण्याचे बंद करण्यात आले होते. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर गत दोन दिवसापासून निरा खो-यात पावसाचे आगमन झाले असुन दोन दिवसाच्या पावसाने वीर, भाटघर, निरा-देवघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्यामुळे चारही धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

वीर धरण ९७ टक्के भरले असल्यामुळे आज मंगळवारी वीर धरणातून ४ हजार ६३७ क्युसेक अधिक उजवा कालव्यातील विद्युतगृहातुन ८०० क्युसेक व डावा कालव्यातील विद्युतगृहातुन ३०० क्युसेक असा एकत्रित ५ हजार ७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी ९ वाजता निरा नदीत सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाणार असल्याचे वीर धरणाचे उप अभियंता नलावडे यांनी माहिती दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरriverनदीmalshiras-acमाळशिरस