शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मोठी बातमी; काळ्या बाजारात विक्रीला जाणारा तांदूळ, गहू टेंभुर्णी पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 15:05 IST

टेंभुर्णी - टेंभुर्णी (ता. माढा ) पोलिसांनी धाडसी कारवाई करून मोडनिंब येथील गोरख पांडुरंग सुर्वे या अडत दुकानातून ट्रकमध्ये ...

टेंभुर्णी - टेंभुर्णी (ता. माढा) पोलिसांनी धाडसी कारवाई करून मोडनिंब येथील गोरख पांडुरंग सुर्वे या अडत दुकानातून ट्रकमध्ये भरण्यात आलेला व गोडाउनमध्ये साठवून ठेवलेला ७ लाख ६५ हजार किंमतीचा संशयित रेशनचा गहू व  १ लाख ७९ हजार किंमतीचा गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला रेशनचा तांदूळ असा ९ लाख ४४ हजार किंमतीचा माल पकडला आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना दि.८  रोजी मोडनिंब येथील मार्केट यार्ड मधील गोरख पांडुरंग सुर्वे या आठ दुकानातून रेशनचा गहू व तांदूळ ट्रकमध्ये भरला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावर कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही. काशीद यांचे पोलीस पथक पाठविण्यात आले. सदर पथक दि. ८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता घटनास्थळी पोचले, तेव्हा एम एच ४५/एएफ ००५४ या क्रमांकाच्या मालट्रकमध्ये गव्हाची पोती भरत असल्याचे निदर्शनास आले तसेच अडत दुकानाच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले ३ लाख ४० किमतीच्या ३५० गोण्या गहू व १ लाख ७९ हजार किमतीचा १५० गोण्या तांदूळ आढळून आला. 

दरम्यान, गोडाऊनमध्ये गव्हर्मेंट ऑफ पंजाब असा शिक्का असलेली रिकामी पोतीही आढळून आली. ट्रकमधील गव्हाचे वजन केले असता ते २५०८०  किलो भरले त्याची किंमत अंदाजे ४ लाख २५ हजार एवढी आहे. असा एकूण ९ लाख ४४ हजार किंमतीचा माल बेकायदेशीर विक्री करण्यासाठी ट्रकमध्ये भरत असताना व गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला पोलिसांना मिळून आला.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-acमाढाSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस