शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; भालकेंच्या वारसदाराबाबत शरद पवारांची चुप्पी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 12:56 IST

भगीरथ भालकेंच्या नावाची घोषणा होऊ लागताच शरद पवार म्हणाले,'आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय.'

पंढरपूर : स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार येणार अन् पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करणार, अशी आशा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना होती, परंतु गर्दीतून भगीरथ भालकेंच्या नावाची घोषणा होऊ लागताच शरद पवार यांनी भाषणात,' आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे,'असे सांगितले.

  दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार आज गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे आले. भालके  कुटुंबीयांच्या भेटीनंतर त्यांनी जमलेल्या लोकांसमोर मनोगत व्यक्त केले. पवार बोलत असताना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार घोषित करावा, अशी मागणी भालकेंच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा पवार करतील, असे कार्यकर्त्यांना वाटले होते. मात्र पवार यांनी सांगितले की, 'आपल्याला एकत्र बसून या विषयावर चर्चा करायची आहे. तत्काळ त्यावर बोलता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे.' विशेष म्हणजे या शब्दावरच पवार यांनी अधिक जोर दिला. त्यामुळे पंढरपूर मतदार संघातील उमेदवार कोण असणार, याचे पत्ते शेवटपर्यंत ओपन झालेच नाहीत.

 दरम्यान, 'विठ्ठल'चे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी मला कारखान्याची माहिती सांगितली असून  इथली स्थिती काळजी करण्यासारखी आहे, असे म्हणत पवारांनी पहिल्यांदा विठ्ठल कारखान्याची घडी बसवणार असल्याचेही स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBharat Bhalkeभारत भालके