शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; भाजप संपर्कातील पाटलांच्या गळ्यात शरद पवारांनी टाकला राष्ट्रवादीचा पंचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 11:36 IST

या प्रसंगी राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले, सध्याच्या घडामोडी नंतर पवार साहेब आपण पहिल्यांदाच अभिजीत पाटील यांच्या कार्यक्रमाला आलात.

सचिन कांबळे 

पंढरपूर : उप मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून भाजपाच्या संपर्कात असलेल्या विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी टाकला राष्ट्रवादीचा पंचा टाकला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सीएनजी बायो गॅस प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी पंढरपुरात आले आहेत.

या प्रसंगी राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले, सध्याच्या घडामोडी नंतर पवार साहेब आपण पहिल्यांदाच अभिजीत पाटील यांच्या कार्यक्रमाला आलात. जो मॅसेज जायचं तो मॅसेज जिल्ह्यात गेला आहे. आ. भारत भालके यांच्या निधनानंतर नंतर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात पोकळी निर्माण झाली आहे. विठ्ठल परिवार पोरका झाला आहे. भाकरी करपली आहे. ती फिरवली पाहिजे सुरुवात आमच्या पासून करा. अभिजीत पाटील यांना आशीर्वाद देऊन तालुक्याचा विकास केला. तसेच दीपक साळुंखे पाटील यांनी काढलेला कारखाना बंद पडलेला कारखाना अभिजीत पाटील यांनी घेतला आणि चालवून दाखवला असे मत व्यक्त केले. त्यांनतर माजी आ. दीपक साळुंखे पाटील यांनी उत्तर देण्यासाठी आले.  आणि मीच अभिजीत पाटील यांना सांगोलाचा कारखाना चावायला घ्या असे सांगितले. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी कारखान्याच्या ऊस मोळी पुजनाला दरेकर यांना बोलावले होते. आणि आता शरद पवारांना बोलावले आहे. यामुळे राष्ट्रवादीचा पंचा अभिजीत पाटील यांच्या गळ्यात घालून लोकांचा संभ्रम दूर करा अशी पाटील व पवार यांच्याकडे मागणी केली.  याचवेळी राष्ट्रवादीचा पंचा अभिजीत पाटील यांच्या गळ्यात शरद पवारांनी टाकून पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला.

दरम्यान, यावेळी आ. रोहीत पवार, धाराशीवचे खा. ओमराजे निंबाळकर, आ. बबनदादा शिंदे, आ. रविंद्र धंगेकर, आ. कैलास पाटील, आ. यशवंत माने, आ.संजयमामा शिंदे, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, माजी आ. राजन पाटील, धनाजी साठे, बळीराम साठे, उमेश पाटील, उत्तमराव जानकर, अजित जगताप, लतिफ तांबोळी, समाधान काळे, दीपक पवार उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाPandharpurपंढरपूर