शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; वाराणसी येथील काशीपीठात होणार धार्मिक त्रिवेणी संगम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 14:55 IST

पंच जगद्गुरु, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार राहणार उपस्थित

सोलापूर : वाराणसी येथील काशीपीठ येथे लिं. श्री श्री श्री 1008 जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांची 105 वा जन्ममहोत्सव, श्री श्री श्री 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा अमृत महोत्सव व प. पू. ष. ब्र. धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी (मठाधिपती, होटगी बृहन्मठ) यांची श्रीक्षेत्र काशीपीठ पट्टाभिषेक सोहळा अशा तीन धार्मिक कार्यक्रमांचा त्रिवेणी संगम होणार असल्याची माहिती अशी पिठाचे नूतन उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.           काशी येथील जंगमवाडी मठात 3 एप्रिल ते 13 मे दरम्यान सलग 42 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रतिदिन अतिरुद्राभिषेक, बिल्वार्चन, कुंकुमार्चन अन्नदान आणि तुलाभार असे कार्यक्रम होणार आहेत. या रुद्राभिषेकामध्ये वाराणसी, शादनगर, बिसनळी, गदग येथील येथील गुरुकुलांचे प्राध्यापक, वैदिक विद्यार्थी आणि विविध प्रांतातील वीरशैव लिंगायत जंगम पुरोहित मंडळ सहभागी होणार आहे. लक्षबिल्वार्चन आणि श्रीयंत्रास ललिता सहस्त्रनाम पठणपूर्वक लक्षकुंकुमार्चन कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांनी दिली.या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व सद्भक्तांसाठी निवास व प्रसादाची सोय करण्यात आली आहे. प्रति दिवस संध्याकाळी धर्म सभेनंतर विद्यमान जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तुलाभार होणार आहे. सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये भक्तीने सहभागी होण्यासाठी सर्व समाजातील लोकांना सेवा करण्याची संधी उपलब्ध आहे तरी सर्व इच्छुक भक्तांनी आपले नाव नोंदवून सेवेत सहभागी होऊन जगद्गुरुंच्या कृपाशीर्वादास पात्र व्हावे आवाहन काशीपीठाचे शिष्य सिद्धय्या स्वामी-हिरेमठ यांनी केले.         या अभूतपूर्व अशा धार्मिक सोहळ्यास पंचपीठाचे जगद्गुरु, विविध मठाचे मठाधिपती, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस सचिव शांतय्या स्वामी, सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, दिलीप दुलंगे, महेश अंदेली, राजशेखर बुरकुले आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSocialसामाजिक