शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; पंढरपुरातील रेल्वे मैदानाच्याजवळ गोळ्यासह बंदूक घेऊन फिरणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 09:14 IST

पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

पंढरपूरपंढरपूर शहरातील रेल्वे मैदानाच्या गेटजवळील रस्त्याच्याकडेला बंदूक घेऊन फिरणाऱ्या दोघांना पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोन जिवंत गोळ्या व एक बंदूक जप्त केली आहे.

रेल्वे मैदानाच्या जवळ स्वप्नील अरुण आयरे (मूळ रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर, सध्या रा. संभाजीचौक, संतपेठ, पंढरपूर) व अंबादास सुरेश पाटोळे (रा. रमाईनगर पाण्याचे टाकीजवळ पंढरपूर, ता. पंढरपूर) बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती सपोनि. सी. व्ही. केंद्रे यांना मिळाली आहे. त्यानुसार त्यांनी तेथे तत्काळ पथक पाठवले. 

त्यावेळी दोघांपैकी स्वप्निल आयरे हा त्याच्या कमरेस अधुन-मधुन हात लावुन इकडुन तिकडे फेऱ्या मारत होता. एकंदरीत त्याच्या हालचालीवरुन त्याने त्याच्या कमरेस  कोणतेतरी हत्यार लावले असल्याची पोलिसांची खात्री झाली आहे. लगेचच पथकाने त्या दोघांना घेराव करून ताब्यात घेतले. यावेळी स्वप्नील अरुण आयरे (मूळ रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर, सध्या रा. संभाजीचौक, संतपेठ, पंढरपूर) याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरCrime Newsगुन्हेगारी