शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; मार्कंडेय रूग्णालयात आॕक्सिजन टाकीचा स्फोट; ५० फूट उंच धुळीचे लोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 06:44 IST

आवाज व धुळीच्या लोटामुळे रूग्णालयात परिसरात एकच गोंधळ; जीवीतहानी नाही

सोलापूर : येथील मार्कंडेय सहकारी रूग्णालयात असलेल्या आॕक्सिजन टाकीचा स्फोट झाला. मोठा आवाज होऊन सुमारे ५० फूट उंच धुळीचे लोट या परिसरात पसरले. त्यामुळे रूग्णांसह हाॕस्पिटल प्रशासनही हादरून गेले आहे. या स्फोटात जीवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र रूणांचे काही नातेवाईक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरास ग्रामीण भागातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे मार्कंडेय रूग्णालयाच्या प्रशासनाने अतिरिक्त आॕक्सिजन सिलेंडर मागवले होते.  मात्र बुधवारी रात्री अचानक आॕक्सिजनच्या मोठ्या टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट कशामुळे झाला हे समजू शकले नाही. पण या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.  स्फोटामुळे सर्वत्र धुळीचे लोट पसरले होते. या भल्या मोठ्या टाकीच्या शेजारीच असलेल्या रिकाम्या जागेत रूग्णांचे काही नातेवाईक जेवण करीत बसले होते. तर काहीजण झोपले होते. अचानक स्फोट झाला आणि सर्वत्र मातीचे लोट पसरले. टाकीच्या शेजारील रिकाम्या जागेत बसलेल्यांचे संपूर्ण शरीर धुळीने माखले.

धुळीच्या लोटामुळे सुमारे १५ मिनिटे समोरचे काहीच दिसत नव्हते. सुदैवाने या स्फोटात जिवीतहानी झाली नाही. मात्र टाकी शेजारील इमारती मध्ये दाखल असलेले रूग्णांना दुसर्या इमारतीमध्ये हलविण्यात आले. अग्निशमनच्या जवानांनी पाण्याच्या फवार्याने पुढील अनर्थ रोखला. या रूग्णालयात कोरोनाचेही रूग्ण आहेत. त्यांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

 ------------

 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात