शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; नरबळी प्रकरणातील आरोपी नानासाहेब डोके यांचे न्यायालयीन कोठडीत निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 06:57 IST

लोकमत न्युज नेटवर्क

मंगळवेढा : राज्यभर गाजलेल्या माचणूर(ता मंगळवेढा)येथील नऊ वर्षीय प्रतीक शिवशरण या बालकाच्या नरबळी प्रकरणी गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ जेलमध्ये असणारे श्री संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब डोके यांचे पुणे येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.    प्रतीक शिवशरण  या इयत्ता तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या बालकाचे २६ ऑक्टोबर २०१८ मध्ये अपहरण केले होते त्याचे अपहरण करून गावाजवळील उसाच्या फडात  हत्या केल्याचे उघडकीस आले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी सखोल तपास करून ही हत्या नसून नरबळी असल्याचे उघडकीस आणून या  प्रकरणाचा उलगडा केला होता. प्रतिक या बालकाचा गुप्त धनाची प्राप्ती आणि कुंटूंबाच्या रोगमुक्तीसाठी नरबळीच्या गुन्हयात श्रीसंत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब  डोके यांना शुक्रवार दि १२ जानेवारी २०१९ रोजी मंगळवेढा पोलिसांनी अटक केली होती.

नरबळीचा हा विकृत आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सरकारी पक्षाने करावी, अशी फिर्यादीचे वकील किर्तीपाल सर्वगोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. चार वेळा न्यायालयाने जामीन नामंजूर केला होता. सरकारतर्फे अ‍ॅड.सारंग वांगीकर मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. अनिकेत निकम,अ‍ॅड. किर्तीपाल सर्वगोड अ‍ॅड.एस. एन. झिरपे, अ‍ॅड.ओंकार बुरकुल यांनी काम पाहिले होते. जेलमध्ये असताना नानासाहेब डोके यांना विविध आजारांनी ग्रासले होते, त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान न्यायालयीन कोठडीत निधन झाले.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयDeathमृत्यूSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस