शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मोठी बातमी; मंगळवेढा नगरपालिकेच्या सर्व जागा लढविणार; काँग्रेसच्या बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 10:15 PM

काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांचा निर्धार

मंगळवेढा : सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वाची बांधणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील सरसावले आहेत. सोलापूर येथील काँग्रेस भवनमध्ये महिला जिल्हा अध्यक्षा शहानवाज शेख, माजी आमदार रामहरी रुपनवर प्रमुख उपस्थितीत होते. नव्या नेतृत्त्वाला संधी, पक्षाच्या बळकटीकरणाचे दुवे साधत व पक्ष मजबूत करण्याचेही काम त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू केले आहे. या संदर्भातच ही बैठक आयोजित केलीली होती. या बैठकीमध्ये मंगळवेढा नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी येत्या नगर पालीकेच्या निवडणूकीमध्ये आपण काँग्रेस पक्षाच्यावतीने सर्व जागा लढवू असा निर्धार केला आहे. 

गेली अनेक वर्षे देशाचे माजी केंद्रिय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे  यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवेढ्यामध्ये चंद्रकांत घुले आणि त्यांचे कार्यकर्ते काम करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वावर निष्ठा ठेवून त्यांनी अनेकवेळा सुशीलकुमार शिंदे  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभूतपूर्व अशा आरोग्य शिबीरांचे आणि मोफत औषध वाटपाचे कार्यक्रमे केले. जनतेच्या मदतीला धावून जात, नागरिकांच्या समस्यांचे निराकारण करत त्यांनी जनतेशी संवादी नेतृत्त्व केले आहे. सध्या सत्तेत असणारे उपनगराध्यक्ष असून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी आपण बांधील राहून काम करू असा विश्वास या बैठकीत व्यक्त केला.

या बैठकीस कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अॕड. नंदकुमार पवार, मारुती वाकडे, अविनाश शिंदे, राहुल टाकणे,  दगडू जाधव, मुललीधर घुले, राजाराम सुर्यवंशी,    सचिन शिंदे,  दिलीप जाधव, नाथा ऐवळे, बापू अवघडे, सुनीता अवघडे, संजय वाघमोडे, परमेश्वर वाघमोडे, अण्णा ताड, अण्णा आसबे, संदीप फडतरे त्याच बरोबर पक्षाचे नेते , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मंगळवेढा  नगर परिषदेची येऊ घातलेली निवडणूक, धडाडीने कार्य करण्याची धवलसिंह मोहिते पाटील यांची पद्धत, पक्षाला उर्जा मिळवून देणारा हा  निर्धार निवडणूकीचे वारे बदलणारा ठरेल. त्यामुळे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांच्या निर्धाराने नेते, कार्यकर्ते आणि राजकीय पटलावर अनेकांच्या चर्चा रंगतील. 

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPoliticsराजकारणElectionनिवडणूक