शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; हुबेहुब दिसणाऱ्या चैतन्यचा पेपर देताना योगेशला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 13:23 IST

दयानंद कॉलेजमधील प्रकार : केंद्रसंचालकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा सुरळीत होत आहेत. शनिवारी दयानंद कॉलेजच्या केंद्रात हुबेहुब दिसत असल्याचा फायदा घेत चैतन्यऐवजी योगेश परीक्षेला बसल्याचे आढळले. त्याला केंद्रसंचालकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. योगेश पवार असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

राज्यभरात बारावीच्या परीक्षा होत असताना, राज्यात काही ठिकाणी कॉपी प्रकरण उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर सोलापुरात खबरदारी घेण्यात येत आहे. अशाचप्रकारे सोलापुरातील दयानंद आर्ट्स कॉलेजच्या केंद्रात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. शनिवारी ३ ते ६ यावेळेत बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर सुरू होता. यात योगेश पवार हा बनावट विद्यार्थी आपल्यासारखाच दिसणारा भाऊ चैतन्यऐवजी परीक्षेला बसला. परीक्षा सुरू होतात ही बाब जेव्हा परीक्षकाला कळाली; तेव्हा त्याने लगेच संबंधित विद्यार्थ्याला विचारणा केली. प्रश्नांचा मारा होताच योगेश हा अडखळला. यामुळे केंद्रसंचालकांनी लगेच याबाबतची घटना वरिष्ठांना कळवत पोलिसांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

--

योगेश कॉमर्सच्या दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी

योगेशने यापूर्वी चैतन्यचा इंग्रजीचा पेपरही दिला होता, असे त्याने कबूल केले. चैतन्य अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे योगेशने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वस्तूत: योगेश हा बी. कॉमच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. परीक्षा देताना केंद्रसंचालकाला योगेशचे हावभाव वेगळे वाटले. त्यामुळे योगेशला हटकले. त्याला परीक्षा हॉलच्या बाहेर नेऊन विचारपूस केली, तेव्हा त्याने कबुली दिली, अशी माहिती सूत्राने दिली.

 

बारावीच्या परीक्षा सुरू असताना दयानंद महाविद्यालयात एक विद्यार्थी डुप्लिकेट आढळला आहे. त्याला केंद्रसंचालकांनी पकडून त्याच्यावर कारवाई सुरू केली आहे. योगेश पवार असे पकडलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो आपल्या भावाऐवजी परीक्षेला बसला होता, अशी प्राथमिक माहिती आहे.

- भास्करराव बाबर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

टॅग्स :Solapurसोलापूरssc examदहावीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस