मोठी बातमी; गुरु अन् शनी एकत्र येणार; सोलापूरकरांना पाहण्याची दोन ठिकाणी केली सोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:36 AM2020-12-21T11:36:15+5:302020-12-21T11:36:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क 

Big news; Guru Anshani will come together; Two places to see Solapurkar | मोठी बातमी; गुरु अन् शनी एकत्र येणार; सोलापूरकरांना पाहण्याची दोन ठिकाणी केली सोय 

मोठी बातमी; गुरु अन् शनी एकत्र येणार; सोलापूरकरांना पाहण्याची दोन ठिकाणी केली सोय 

Next

सोलापूर : सोमवारी ( दि. २१) संध्याकाळी आकाशामध्ये ३० ते ७.५० या वेळेत सूर्यमालेतील सर्वात मोठाग्रह गुरु आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. याला ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात गुरु व शनि है दौन ग्रह यापूर्वी १२२६ आणि १६२३ मध्ये जवळ आले होते. त्यानंतर आता २१ डिसेंबर २०२० रोजी दोन ग्रह कमी अतरावर येण्याची दुर्मीळ खगोलीय योग आला आहे. हा योग पाहण्यासाठी सोलापूर आणि आचेगाव येथे सोय करण्यात आली आहे.

ग्रेट कन्झिकेशन्स हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. आजघडीला पृथ्वीवर असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिले नाही आणि या नंतर पहाण्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल.

पृथ्वीवरून अगदी ०.१ डिग्री अंतरावर दोन्ही ग्रहांना एकाचवेळी निरीक्षण व अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. वीस वर्षांपूर्वी हे परस्परांचे जवळ आले होते.शनि सुमारे १२ डिग्री आणि गुरु ३० डिग्रीपर्वत पृथ्वीवरील वर्षात प्रवास करेल. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी १८ डिग्री जवळ येतील आणि जवळ येण्यास २० वर्षे लागतील शनि आणि गुरूमधील अंतर ७३० दशलक्ष दिवस  किलोमीटर आहे . शेवटच्या वेळी म्हणजेच २८ मे २००० रोजी है अंतर १.२५ डिग्री होते. विशेष म्हणजे या दोन्ही ग्रहाचा निरीक्षण टेलिस्कोपने करत असताना दोन्ही पाहाये काही पाहण्यास मिळतात
--
कन्झिकेशन्स म्हणजे काय ? 
कन्झिकेशन्स म्हणजे जेव्हा दोन वस्तू आकाशात एकमेकाच्या जवळ दिसतात. गुरु आणि शनि यांचा एक कन्झिकेशन्स- दर २० वर्षांतून एकदाच घडले- याला एक ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात ,
---
टेलिस्कोपने येथे पाहू शकता 
टेलिस्कोपद्वारे सदरची खगोलीय घटना पाहण्यासाठी सोलापूर विज्ञान केंद्रामार्फत सोलापूर विज्ञान केंद्र आणि आचेगाव येथील श्री शावरसिद्ध प्रशालेच्या  पटांगणात सोय करण्यात आलेली आहे.
----
या संपूर्ण खगोलीय घटनेचा आपण आपल्या कुटुबासमवेत आनंद घ्यावा, यापूर्वी १२२६ व १६२३ मध्ये अशा प्रकारची दुर्मिळ खगोलीय घडलेली होती, ही आपणास डोळ्यांनी देखील पाहता येते. नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल.
- राहुल दास, संग्रहालय अभिरक्षक, सोलापूर विज्ञान केंद्र

Web Title: Big news; Guru Anshani will come together; Two places to see Solapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.