शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; पंढरपुरातील भीमा नदीला पुराचा धोका; दोन बोटीसह अन्य यंत्रणा सज्ज

By appasaheb.patil | Updated: August 13, 2022 17:13 IST

पंढरपूर :  उजनी व वीर धरणातून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.  भीमा नदीच्या पाणीपातळीत सतत वाढ ...

पंढरपूर :  उजनी व वीर धरणातून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.  भीमा नदीच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. यामुळे येणाऱ्या संभाव्य  पूरपरस्थितीवर मात करण्यासाठी  तसेच जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून चंद्रभागा नदीत दोन बोटीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. 

संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेवून तालुक्यात गावपातळीवर तसेच पंढरपूर शहरात  आपत्ती निवारणार्थ यंत्रणा गतिमान केली आहे. यापुर्वीच्या आपत्ती धोक्याचा अभ्यास करुन त्या ठिकाणी आवश्यकती खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील  नदीवरील  सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच  नदीवर चार पुल असून त्यापैकी दगडी  पुल पाण्याखाली गेला आहे. नदी काठावरील नागरिकांनी व पंढरपूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. तसेच आपत्तीकालिन परिस्थिचा मुकाबला  करण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी सांगितले.

चंद्रभागा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापनातंर्गत महसूल व नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चंद्रभागा नदीत दोन रबरी मोटार बोटीची व्यवस्था करण्यात आली असून, लाइफ जॅकेटस्‌, फ्लोटींग रिंग,  रोप,  सर्च लाईट, ध्वनीक्षेपक,  रेस्क्यू किट इत्यादी साहित्य उपलब्ध करण्यात आले असून चंद्रभागानदी काठावरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सूचना दिल्याच्या  तहसिलदार सुशिल बेल्हेकर व मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले. 

चंद्रभागा नदीपात्रात भाविकांनी  व नागरिकांनी जावू नये तसेच होडी चालकांनी नदीपात्रात होडी घेवून जावू नये यासाठी ध्वनीक्षेपकाव्दारे वेळोवळी सूचनाही प्रशानकडून देण्यात येत आहेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी व भाविकांनी पालन करावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.  

भीमा नदीपात्रातील विसर्ग

वीर आणि उजनी धरणातून  भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून, आज दुपारी 4.00 वाजेपर्यत वीर धरणातून  नीरा नदी पात्रात 33 हजार 659 क्युसेक्स तर उजनीतून  61 हजार 600 क्सुसेक  भीमा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या पंढरपूर मध्ये भीमा नदी  54  हजार  702  क्युसेकने  पाणी वाहात आहे. भीमा  नदीपात्रात 1 लाख 15 हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर  ( 443.600 पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते,  1 लाख 38  हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर  ( 443.600 पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर 1 लाख 70 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर  ( 445.500 पाणी पातळी मीटर) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. तर 1 लाख 97  हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर  ( 446.300 पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरriverनदीPandharpurपंढरपूर