मोठी बातमी; सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 03:46 PM2021-07-25T15:46:34+5:302021-07-25T15:46:41+5:30

पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागविले-निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम मिळणार

Big news; The election trumpet of co-operative housing societies will sound | मोठी बातमी; सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार

मोठी बातमी; सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार

Next

सोलापूर : ई-वर्गातील संस्था ज्यांचे २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक होणार घेण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी शुक्रवारी दिली.

शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी (वरिष्ठ लिपीकपेक्षा जादा दर्जा असलेले), प्रमाणित लेखापरीक्षक, पाच वर्षांचा अनुभव असलेले वकील, ६५ वर्षांपेक्षा जास्त वय नसलेले निवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना अर्ज करता येणार आहे. अर्जाचे नमुने १५ जुलै ते १७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत उपलब्ध होतील.

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे, जिल्हा उपनिबंधक, पुणे शहर, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ग्रामीण, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ इमारत, पहिला मजला ५, बी. जे. रोड, पुणे आणि जिल्हा उपनिबंधक, सोलापूर येथे ‌अर्जाचे नमुने कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. अर्जदारांनी अर्ज २३ ऑगस्ट २०२१पर्यंत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयात वेळेत सादर करावेत, असे आवाहन भोळे यांनी केले आहे.

Web Title: Big news; The election trumpet of co-operative housing societies will sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.