शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

मोठी बातमी; सर्व्हर क्रॅशमुळे तीन दिवसांच्या विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 21:05 IST

Solapur univarsity exam news; 9 ऑक्टोबरपासून परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार

 

सोलापूर :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र परीक्षेच्या ऑनलाइन पोर्टलवर व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर क्रॅश झाले आहे. त्यामुळे सहा ते आठ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली. नऊ ऑक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

सोमवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा यशस्वीपणे विद्यापीठाकडून घेण्यात आली. मंगळवारी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी ऑफलाइन परीक्षा सुरळीतपणे पार पडली. मात्र ऑनलाइन परीक्षेत सर्व्हर क्रॅशमुळे व्यत्यय आला. 6 ऑक्टोबर रोजी होणारी  ऑनलाइन परीक्षा आता 21 ऑक्टोबर रोजी नियोजित वेळापत्रकानुसार होईल. 7 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा 22 ऑक्टोबर रोजी तर 8 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा 23 ऑक्टोबर रोजी नियोजित वेळापत्रकानुसार होतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

सर्व्हर लोडमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळ बदलण्यात आली असून 11:30 ते 4:30 या वेळेत होणारी परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत होईल, अशी माहिती परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली. तांत्रिक कारणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झालेला आहे, याची सर्व विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी व पालकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

25 टक्के विद्यार्थ्यांची यशस्वी परीक्षामंगळवारी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या 25 टक्के एटीकेटी विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. सहा हजार पैकी 1 हजार 561 विद्यार्थ्यांनी मंगळवारी यशस्वीपणे परीक्षा दिली आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरexamपरीक्षाEducationशिक्षण