शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कथित दुसऱ्या पत्नीच्या व्हिडीओनंतर भाजपा जिल्हाध्यक्षाचा राजीनामा; सोलापूरच्या राजकारणात धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 19:41 IST

या व्हिडिओत दिसते की, ही महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसून-हमसून स्वतःचं नाव सांगते

सोलापूर: भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरुममधील खळबळजनक व्हीडिओ एका महिलेने व्हायरल केला. तसेच गेल्या तीन वर्षांपासून आपण पत्नी म्हणूनच त्यांच्या सोबत राहतोय, अशी तिची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर जोरात फिरली. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठांनी आदेश देताच श्रीकांत देशमुख यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

या व्हिडिओत दिसते की, ही महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसून-हमसून स्वतःचं नाव सांगते. तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसते. नंतर आलिशान बेडरूममधील डबल बेडवर अंतर्वस्त्रावर बसलेल्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे मोबाईलचा कॅमेरा फिरवत ती म्हणते की, 'हा जो माणूस आहे, नाव श्रीकांत देशमुख आहे. यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा,'

सुरुवातीला काय चालले आहे, हे न समजल्याने गोंधळलेले देशमुख बेडवरून उठतात. त्या महिलेच्या अंगावर धावून येत मोबाईलवरील व्हिडिओ बंद करण्यासाठी ढकला-ढकली करतात. याचवेळी ती महिला म्हणते, 'नाही. आता तू बघंच..तुला नाही सोडणार. तू माझ्याशी का खोटं बोलला ?'मात्र ती चवताळून बोलत असतानाच कॅमेरा बंद केला जातो. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी व्हायरल झाला. त्यानंतर भाजप पक्षातील वरिष्ठ यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी तत्काळ श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा घेतला. विशेष म्हणजे पक्षाच्या लेटरहेडवरील हा राजीनामाही घाईघाईने सोशल मीडियावर टाकण्यात संबंधित कार्यकर्तेच धडपड करीत होते.

महिलेच्या बेडरुममध्ये म्हणे बनियनवर ग्रीन टी !

श्रीकांत देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, या महिलेने ग्रीन टी मध्ये गुंगीचे औषध घालून माझ्याबरोबर आक्षेपजनक व्हीडिओ बनविला. त्यानंतर चारित्र हननाचा प्रयत्न केला. यात राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, तसेच संबंधित महिलेविरुद्ध मी ओशिवारा अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये हनी ट्रॅपिंग व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ऑडिओ क्लीपमध्ये लग्नाचा उल्लेख

देशमुख आणि संबंधित महिला यांच्यातील १७ मिनिटांची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. मोबाईलवर बोलताना या महिलेने देशमुखांना म्हटले आहे की, बाळासाठी मी तुमच्यावर प्रेम केले. लग्न केले. तीन वर्षे सोबत राहिले. तरीही मलाच बदनाम केले जात आहे. मी आता तुम्हाला सोडणार नाही. फडणवीसांशीही या विषयावर सविस्तर बोलणार आहे. तुम्ही आता आमदार कसे होता, हे पाहते. माझी हाय तुम्हाला लागली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीchandrakant patilचंद्रकांत पाटील