शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापुरातील ४०० स्टेशन मास्तर एक दिवस सुट्टीवर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 18:39 IST

प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; केंद्र सरकारविरोधात रेल्वे कर्मचारी आक्रमक

सोलापूर : रेल्वेचे सुरू असलेले खासगीकरण बंद करावे, स्टेशन मास्तरांच्या रिक्त जागा तत्काळ भराव्यात, स्टेशन मास्तरांना तणाव भत्ता त्वरित लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील ३५ हजार स्टेशन मास्तर एक दिवस सामूहिक रजेवर जाणार आहेत. या संपात सोलापुरातील ४०० स्टेशन मास्तरांचा सहभाग असणार आहे.

अखिल भारतीय स्टेशन मास्तर असोसिएशनच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी ३१ मे २०२२ रोजी सामूहिक रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑक्टोबर २०२० रोजी याच मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. तिसऱ्या टप्प्यात २० ते २६ ऑक्टोबर २०२१ या आठवड्यात काळ्या फिती लावून देशभरातील स्टेशन मास्तरांनी विरोध दर्शविला होता. तसेच चौथ्या टप्प्यात ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस उपाशी राहून काम केले व पाचव्या टप्प्यात धरणे आंदोलन केले. तरीही प्रशासनाने अद्यापपर्यंत दखल घेतली नाही. यामुळे संघटनेने आता यापुढील आंदोलने तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

-------

या आहेत मागण्या...

  • - स्टेशन मास्तरांना सुरक्षा व तणावमुक्तीसाठी भत्ता द्यावा
  • - स्टेशन मास्तरांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात
  • - रात्रपाळीची सिलिंग मर्यादा ४३ हजार ६०० रुपयांचा आदेश रद्द करावा
  • - एम. ए. सी.सी.पी.चा लाभ १ जानेवारी २०१६ पासून लागू करावा
  • - स्टेशन मास्तर पदनाम परिवर्तनासोबतच केडरचे शुद्ध वर्गीकरण करावे
  • -रेल्वेचे खासगीकरण बंद करावे
  • - नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना चालू करावी

---------

३१ मे २०२२ रोजीचे स्टेशन मास्तरांचे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची मागणी आहे. यापूर्वी अनेकवेळा आंदोलने करूनही यावर तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे यापुढील आमची आंदोलने तीव्र असणार आहेत.

- संजय अर्धापुरे, सोलापूर मंडल अध्यक्ष, अखिल भारतीय स्टेशन मास्तर असोसिएशन

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे