शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोठी बातमी; पंढरपुरातील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 14:18 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर / पंढरपूर :-  आषाढी वारीच्या निमित्ताने होणार वाढती गर्दी लक्षात घेता आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे  दर्शन सुलभ व तत्पर होण्याच्या दृष्टीने आज  शुक्रवार १ जुलै २०२२ पासून ‘श्री’ चे दर्शन २४ तास सुरु ठेवण्यात आले असल्याची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १० जुलै २०२२ रोजी होणार असून, आषाढी वारी निमित्त पायी पालखी सोहळ्यासोबत परराज्यातील तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या  यात्रा कालावधीत पंढरपूरात सुमारे १० ते १२ लाख भाविक येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून, मंदीर प्रशासनाकडून चांगला दिवस मुहर्त पाहून श्रीचा पलंग काढून भाविकांसाठी १ ते १८ जुलै २०२२ या कालावधीत २४ तास दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे.

सकाळी  देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला. श्री  विठ्ठलास  मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणीमातेस तक्या लावण्यात आला आहे. आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत (दि.१८ जुलै) बंद राहतील. या कालावधीत श्री ची नित्यपुजा, महानैवद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरु राहतील. नित्योपचाराची वेळा वगळता श्री  चे पददर्शन २२.१५ तास सुरु राहील तर मुखदर्शन २४ तास सुरु राहील असे  गुरव यांनी सांगितले.

श्री चे दर्शन २४ तास सुरु केल्याने आता दररोज ४० ते ४५ हजार भाविकांना पददर्शन तर ५० ते ५५ हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत  दररोज एक लाख भाविक दर्शन घेत असतात. या कालावधीत श्री चे २४ तास दर्शन सुरु केल्याने भाविकांना कमी अवधीत दर्शन  होणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.

यावेळी मंदिर समितीचे सह. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह भ प प्रकाश जवंजाल, ह भ प शिवाजी मोरे, संभाजी शिंदे, शंकुतला नडगिरे, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpurपंढरपूर