मोठी बातमी; कार्तिक वारीनिमित्त पंढरपुरातील  विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरु 

By Appasaheb.patil | Published: October 28, 2022 04:51 PM2022-10-28T16:51:53+5:302022-10-28T16:51:59+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

big news; 24-hour darshan of Vitthal-Rukmini Mata in Pandharpur on the occasion of Kartik Vari | मोठी बातमी; कार्तिक वारीनिमित्त पंढरपुरातील  विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरु 

मोठी बातमी; कार्तिक वारीनिमित्त पंढरपुरातील  विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरु 

Next

पंढरपूर : कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता. आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे  दर्शन सुलभ व तत्पर होण्यासाठी शुक्रवार २८ ऑक्टोबर २०२२ पासून ‘श्री’ चे दर्शन २४ तास सुरु ठेवण्यात आले असल्याचे मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

कार्तिक शुद्ध एकादशी सोहळा ४ नोव्हेबर २०२२ रोजी होणार असून, या  यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात सुमारे ८ ते १० लाख भाविक येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून, मंदीर प्रशासनाकडून चांगला दिवस मुहर्त पाहून श्रीचा पलंग काढून भाविकांसाठी २८ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २४ तास दर्शन सुरु ठेवण्यात आले असल्याचे व्यवस्थापक पुदलवाड यांनी सांगितले.  

सकाळी  देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला. श्री  विठ्ठलास  मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणीमातेस तक्या लावण्यात आला आहे. आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत (१३ नोव्हेंबर) बंद राहतील. या कालावधीत श्री ची नित्यपुजा, महानैवद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरु राहतील. नित्योपचाराची वेळा वगळता श्री  चे पददर्शन 22.15 तास सुरु राहील तर मुखदर्शन २४ तास सुरु राहील .

श्री चे दर्शन २४ तास सुरु केल्याने आता दररोज सुमारे ३५ ते ४० हजार भाविकांना पददर्शन तर सुमारे ४० ते ४५ हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत श्री चे २४ तास दर्शन सुरु केल्याने भाविकांना कमी अवधीत दर्शन  होणार असल्याचे मंदीर समितिचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

           यावेळी मंदिर समितीचे सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवी निगडे, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभाग प्रमुख श्री पांडूरंग बुरांडे आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: big news; 24-hour darshan of Vitthal-Rukmini Mata in Pandharpur on the occasion of Kartik Vari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.