शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

मोठी बातमी; पंढरपुरात २४ तासांची संचारबंदी जाहीर; एकाही भक्ताला प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 10:29 AM

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे यंदा पंढरपुरातील माघी यात्राही भक्ताविना साजरी होणार आहे. यात्रेसाठी २२ फेब्रुवारी रात्री १२ वाजल्यापासून २३ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत २४ तासाची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनामुळे यात्राकाळात कोणत्याही भाविकाला पंढरपूर शहरात येता येणार नाही. ही संचारबंदी पंढरपूर शहरासह परिसरातील १० गावात असणार आहे.

 

माघी यात्रा साजरी करण्या संदर्भात निघाला शासन आदेश... पंढरपुरसह काही गावात संचार बंदी

कमी झालेला कोरोना संसर्गजन्य रोग पुन्हा वाढताना दिसून येत आहे. यामुळे तीन दिवसावर आलेल्या माघ वारी संदर्भात शासनाने शुक्रवारी आदेश काढले आहेत. यामध्ये २२ फेब्रुवारी रात्री १२.०० वा. पासून ते २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत (२४ तास) पंढरपूर शहराच्या आजूबाजूस असणारी गावात संचारबंदी अनेक सूचना दिल्या आहेत. त्या सूचना पुढील प्रमाणे आहेत.

◼️ संचारबंदी :-माघवारी निमित्त ३ ते ४ लाख भाविक पंढरपूरमध्ये असतात. माघवारी निमित्त कोरोनाच्या पार्श्वभुमी लक्षात घेता भाविक पंढरपूरमध्ये येऊ नयेत व पंढरपूर मध्ये गर्दी होऊ नये यासाठी दिनांक २२/२/२०२१ रोजी रात्री १२.०० वा. पासून ते दि.२३/२/२०२१ रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत (२४ तास) पंढरपूर शहराच्या आजूबाजूस असणारी भटूंबरे, चिंचोळी भोसे, शेगांव दु, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव-शिरढोण व कौठाळी इत्यादी गावांमध्ये व संपूर्ण पंढरपूर शहरात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतुदीन्वये संचारबंदी आदेश लागू करणेत येत आहे. त्याबाबतचे स्वतंत्र आदेश निर्गमित करणेत येत आहे. सदर आदेशाचे पालन करणे सर्व सबंधितांवर बंधनकारक राहील.

◼️ प्रवासी वाहतूक सेवा नियंत्रीत करणे :-माघी वारीला बहुसंख्य वारकरी हे रेल्वे, एस.टी.महामंडळाची वाहने, खाजगी गाडयामधून येत असतात. माघ शुद्ध दशमी (दि.२२/०२/२०२१) व माघ शुद्ध एकादशी (दि.२३/०२/२०२१) या काळात ही वाहतूक सेवा पुर्णपणे बंद न करता नियंत्रीत ठेवावी, जेणेकरून सर्वसामान्य प्रवासी, वैद्यकिय सेवा व इतर सेवा चालू राहतील. मंदिर परिसरापासून दूरवर अंतरावर सर्वसामान्य प्रवासी उतरेल याबाबत आवश्यक ते नियोजन पोलीस विभाग, परिवहन विभाग व एस.टी.महामंडळ हे करतील.

◼️ पायी दिंडयांना प्रतिबंध करणे:-माघी यात्रेला राज्यभरातून ०३ ते ०४ लाख वारकरी राज्याच्या विविध भागातून येतात. राज्यभरातून २५० पेक्षा जास्त पायी दिंडया या काळात पंढरपूरला येतात. या दिंडया मराठवाडा, कोकण, विदर्भ, कर्नाटक, आंध्र, दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणाहून येतात. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभुमीवर या पायी दिंडयांना पंढरपूर दिशेने प्रस्थानास बंदी करणेत येत आहे.

◼️ मठांतील वारकरी संख्या नियंत्रीत असावी:-पंढरपूर शहर व परिसरामध्ये जवळपास १२०० मठ असून यात्रेपूर्वी काही दिवस अगोदर या मठामध्ये बाहेरगावाहून वारकरी वास्तव्यास येण्याची शक्यता आहे. तसेच ६५ एकर परिसर, चंद्रभागा नदीपात्र याठिकाणीही वारकरी वास्त्यव्यास येत असतात. स्थानिक नगर परिषदेकडून वारी संपेपर्यंत मठांची दररोज तपासणी करणेत यावी. मठामध्ये नव्याने येणा-या सर्व लोकांना बंदी करणेबाबतच्या उपाययोजना उपविभागीय अधिकारी पंढरपूर व मंदिर समिती हे करतील. व त्यास प्रसिध्दी देतील. पोलीस विभागामार्फत मठ प्रमुखांच्या बैठका घेणेत येवून त्यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटिस बजावतील.

◼️ आरोग्य व्यवस्थापन :-आरोग्य विभाग हा पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, नगर पालिका प्रशासन तसेच इतर विभागाचे सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांची थर्मलस्क्रीनिंग करेल. तसेच पल्स ऑक्सी मीटरच्या सहाय्याने शरीरातील ऑक्सीजनची तपासणी करेल. मंदिर समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, शासकीय कर्मचारी अधिकारी, यांच्या तपासणीसाठी Antigen Test kit 4/6 उपलब्धता करणेत येईल. तसेच १०८ ची रुग्णवाहिका सोबतच Cardiac Ambulance ही ठेवण्याचे नियोजन करणेत यावे. On Duty Staff ची काळजी घेणेसाठी त्यांना N-९५ मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणेत यावे.

◼️ श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनाबाबत- संपूर्ण देशात व राज्यात कोविड-१९ संसर्गाचा धोका अदयापही कायम असल्याने व माघ यात्रेमध्ये भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मागील सात-आठ महिन्यामध्ये संपूर्ण गहाराष्ट्रात ज्याप्रमाणे रार्व धार्गिक सण यात्रा / यात्रा अत्यंत साध्या पध्दतीने लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. त्याप्रमाणे माघ यात्रेला होणारी गर्दी व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता श्रींचे दर्शन माघ शुध्द दशमी (दि.२२/२/२०२१ ) व माघ शुध्द एकादशी (दि.२३/२/२०२१) या दिवशी बंद ठेवणेत यावे. तथापि श्रींचे परंपरेनुसार चालत असलेले सर्व नित्योपचार मंदिर समितीमार्फत कायम राहील. मंदिर व मंदिर परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठी मंदिर समिती, उपविभागीय अधिकारी व पोलीस विभाग यांचेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. उपरोक्त विधीवत पुजा करताना सबंधितांनी मास्कचा वापर करणे, सोशल डीस्टनसिंग चे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारकराहील.

◼️ श्री.ह.भ.प. वासकर महाराज यांच्या दिंडीस प्रवेश देणेबाबत- माघ दशमी दिनांक २२/२/२०२१ रोजी श्री ह.भ.प. वासकर महाराज यांच्या दिंडीस मंदिरात पालखी दरवाजातून प्रवेश देण्यात येतो मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ह.भ.प.वासकर महाराज यांच्या दिंडीस १+५ वारकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिरात प्रवेश देणेत यावा. श्री.विठठल सभा मंडपात आरती व अभंग करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही कार्यकारी अधिकारी मंदिरे समिती यांनी करावी. उपरोक्त विधीवत पुजा करताना सबंधितांनी मास्कचा वापरकरणे, सोशल डीस्टनसिंग चे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

◼️ श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणी मातेच्या नित्यपुजेबाबत- माघ शुध्द एकादशी (दि.२३/०२/२०२१) रोजी होणा-या श्री.विठ्ठल व रूक्मिणी मातेचीनित्यपुजा मंदिर समितीचे मा.सह अध्यक्ष / सदस्य महोदयांच्या हस्ते सपत्नीक करणेत येते. श्री विठठलाची नित्यपुजा मंदिर समितीचे एक सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक (२+३=५) व श्री.रूक्मिणी मातेची नित्यपुजा मंदिर समितीचे एक सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक (२+३=५) यांना करणेसपरवानगी देणेत येत आहे. तसेच या पुजेच्या वेळी पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी तसेच मंदिर समिती व सल्लागार परिषदेचे सदस्य महोदय व अधिकारी उपस्थित राहतील. उपरोक्त विधीवत पुजा करताना सबंधितांनी मास्कचा वापर करणे, सोशल डीस्टनसिंगचे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

◼️ श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेस नैवेद्यः-माघ शुध्द व्दादशी दि.२४/२/२०२१ रोजी श्रींना नैवेदय दाखविण्याची परंपरा आहे. त्या दिवशी दोन व्यक्तींसह मंदिरात नैवेदय दाखविण्यासाठी प्रवेश देणेत यावा. तसेच त्यांना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी हे प्रवेशपत्रिका व योग्य वेळ निश्चित करून देतील. उपरोक्त विधीवत पुजा करताना सबंधितांनी मास्कचा वापर करणे, सोशल डीस्टनसिंगचे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

◼️ श्री.ह.भ.प.औसेकर महाराज यांचे चक्रीभजन:-माघ शुध्द त्रयोदशी (दि.२५/०२/२०२१) रोजी श्री.ह.भ.प. औसेकर महाराज यांना १+११ मानकरी यांच्या उपस्थितीत श्री विठठल मंदिर सभा मंडपात योग्य ती खबरदारी घेवून साध्या पध्दतीने चक्रीभजन करणेस परवानगी देणेत येत आहे. वरील सर्व धार्मिक कार्यक्रमांबाबत आवश्यक ती कार्यवाही कार्यकारी अधिकारी, मंदिरे समिती करतील. उपरोक्त विधीवत पुजा करताना सबंधितांनी मास्कचा वापर करणे, सोशल डीस्टनसिंगचे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

◼️ श्री.पुंडलीक राया उत्सवाचा काला :-माघ शुद्ध त्रयोदशी (दि.२५/०२/२०२१) रोजी श्री.पुंडलीक राया उत्सवाचा काला या कार्यक्रमात १+२५ वारकऱ्यांच्या उपस्थितीत परवानगी देणेत येत आहे. हा काला दिनांक २५/०२/२०२१ रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत पार पाडणेत यावा. उपरोक्त विधीवत पुजा करताना सबंधितांनी मास्कचा वापर करणे, Social Distancing चे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

 

◼️ माध्यम प्रतिनिधी व्यवस्था :-यात्रेदरम्यान श्री विठठल रूक्मिणी मंदिर येथील धार्मिक विधी, नित्यपुजा, दिंडी, आरती, महापूजा यांचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह, यु टयुब, तसेच मोबाईल अॅप या समाजमाध्यमांव्दारे करणेत यावे. तसेच जास्तीत जास्त भाविकांनी समाजमाध्यमाव्दारे यात्रेतील कार्यक्रम पाहणेबाबत आवाहन मंदिर समितीने करतील. सन २०२१ च्या पंढरपूर येथील माघ यात्रेमध्ये सर्व सामान्य भाविकांना सहभागी होता येणार नसल्यामुळे मंदिरामधील सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था कार्यकारी अधिकारी, श्री विठठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांनी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या निर्देशानुसार करतील. तसेच माध्यम व्यवस्था मंदिर समिती व जिल्हा माहिती अधिकारी हे समन्वयाने करतील.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर