शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘भिडें’ना समर्थन नाही ! बाळा नांदगावकर याची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:33 IST

महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे संपर्कप्रमुख बाळा नांदगावकर यांची सोलापूर लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट

ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही महाराष्टÑातील मोठी माणसेलोकमतमधील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे

सोलापूर: ठाकरे कुटुंबाने कधी जातपात पाळली नाही. त्यामुळे मनसेने भिडे गुरुजींचे समर्थन करण्याचा अथवा न करण्याचा प्रश्न येत नाही. गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असे प्रतिपादन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे संपर्कप्रमुख बाळा नांदगावकर यांनी केले.

मनसेच्या एका कार्यक्रमासाठी बाळा नांदगावकर गुरुवारी सोलापूरला आले असता सायंकाळी त्यांनी लोकमत कार्यालयाला भेट दिली. संपादक राजा माने आणि सहा. सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी लोकमतमधील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. 

नांदगावकर म्हणाले, एकबोटे गुन्हेगार होते म्हणून त्यांना अटक झाली. भिडे गुन्हेगार असतील तर त्यांना अटक करावी. राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. मराठी माणसांनी एकत्र का येऊ नये, हा आमचा मुद्दा आहे. बाळासाहेबांनी २० टक्के राजकारण आणि ८० टक्के  समाजकारण करण्याचे सांगितले. नवी पिढी त्याउलट ८० टक्के राजकारण करीत आहे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेतील नव्या पिढीचे नाव न घेता लगावला.

राज्यातील राजकारणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे अलीकडे आमची टाळी मंचावरून मागत आहेत. मात्र २०१४ च्या निवडणुकीदरम्यान राज ठाकरे टाळी द्यायला त्यांच्याकडे गेले होते, तेव्हा त्यांनी घेतली नाही. महाराष्टÑाच्या विकासाची ब्लू प्रिंट आम्ही तेव्हा बनविली होती. ती पुढे भाजपानेच चोरली. आमची टाळी न घेता भाजपाकडे वळलेल्या शिवसेनेमुळे सर्वांचीच फसगत झाली. नुकसान सर्वांचेच झाले.

राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत वाढलेली जवळीक हे भविष्यातील युतीचे संकेत आहेत का, यावर ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही महाराष्टÑातील मोठी माणसे; त्यांचा स्नेह राजकारणाच्या पलीकडचा होता. राज ठाकरेंना त्याबद्दल आदर आहे. याचा अर्थ दोघांतील राजकीय जवळीक वाढली, असा काढला जाणे चुकीचे आहे. राज ठाकरे यांचे संबंध सर्वांशीच असून, त्यांचे द्वेषाचे राजकारण कधीच नसते. 

या भेटीदरम्यान मनसेचे पदाधिकारी दिलीप धोत्रे, दिनकर मांजरेकर, निलेश भंडारे, युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, उमेश रसाळकर, सत्तार सय्यद, अमर कुलकर्णी, वैभव धोत्रे, अभिजित डुबल, जैनुद्दीन शेख यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरMNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकर