भावजयीस दिराने विळ्याने मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:27 IST2021-09-05T04:27:11+5:302021-09-05T04:27:11+5:30

वैराग : चिंचखोपन (ता. बार्शी) येथे शेतात आल्याचा मनात राग धरुन दीर आणि पुतण्याने भावजयीस विळा आणि काठीने ...

Bhavjayis was killed by Dira with a fork | भावजयीस दिराने विळ्याने मारले

भावजयीस दिराने विळ्याने मारले

वैराग : चिंचखोपन (ता. बार्शी) येथे शेतात आल्याचा मनात राग धरुन दीर आणि पुतण्याने भावजयीस विळा आणि काठीने मारहाण केल्याचा प्रकार घटला आहे. या दोघांविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गुरूवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान शालन अंगदराव जाधव (रा. जवळगाव, ता. बार्शी) या चिंचखोपन शिवारात शेतात जनावरांची झाडलोट व घासगवत कापण्यासाठी गेल्या. त्यावेळी तेथे चुलत दीर माणिक लक्ष्मण जाधव व त्यांचा मुलगा सौदागर माणिक जाधव आले आणि शेतात कशी काय आलीस ? तुझ्या मुलाने व नवऱ्याने आम्हाला खूप मारले आहे म्हणत शिवीगाळ करुन हातातील विळा हिसकावून हातावर, पोटाच्या बाजूस वार केले. सौदागरने लाकडी काठीने मारुन जखमी केले. दरम्यान शालन भाचा दत्तात्रय जगताप हा जनावरांचे दूध काढण्याकरिता आला होता. त्याला पाहून माणिक व सौदागर जाधव हे तेथून निघून गेले.

Web Title: Bhavjayis was killed by Dira with a fork