शेता शिवारात भाऊसाहेब दिसू लागले मोबाईलमध्ये व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:27+5:302021-09-14T04:26:27+5:30

कृषी क्षेत्रात पीकपाणी नोंदणीला महत्त्व आहे. या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील विविध सुविधांचा लाभ घेता येतो. कृषी विभागाने ...

Bhausaheb started appearing in the field, busy in mobile | शेता शिवारात भाऊसाहेब दिसू लागले मोबाईलमध्ये व्यस्त

शेता शिवारात भाऊसाहेब दिसू लागले मोबाईलमध्ये व्यस्त

कृषी क्षेत्रात पीकपाणी नोंदणीला महत्त्व आहे. या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील विविध सुविधांचा लाभ घेता येतो. कृषी विभागाने जारी केलेल्या ॲपमधील नोंदणी प्रक्रियेला १ महिन्यापासून सुरुवात झाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, कृषी केंद्र, कारखाना शेती विभागातील कर्मचारी, शेती महामंडळ कर्मचारी अशा ५ ते ६ हजार व्यक्तींना पीकपाणी नोंदणीचे ट्रेनिंग दिले आहे. मात्र स्लो ॲप, नेटवर्क प्रॉब्लेम, नोंदणी धीम्या गतीने सुरू आहे.

वेळेचे प्रश्नचिन्हच..

माळशिरस तालुक्यात अंदाजे १ लाख ४७ हजार जिल्ह्यात सर्वाधिक खातेदार आहेत. ९ ऑगस्ट रोजी ७७४७ खातेदारांनी पीकपाणी नोंदणी केली होती. सध्या ही नोंदणी पाच ते सहा टक्के पूर्ण झाली आहे. १५ सप्टेंबरअखेर नोंदणी करता येणार असल्याची माहिती महसूल विभाग देत आहे. मात्र प्रत्यक्ष ही नोंदणी धीम्या गतीने सुरू असून वेळेत पूर्ण होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

कोट :::::::::::::::::

तलाठी शेतात येऊन या ॲपसंबंधी प्रशिक्षण देत आहेत. मात्र टेक्निकल प्रॉब्लेममुळे तासन् तास ही प्रोसेस होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. शासनाने याबाबतीत सुलभता आणली तरच वेळेत पीकपाणी नोंदणी करणे शक्य होणार आहे.

- सुनील सर्जे, शेतकरी, माळशिरस

कोट ::::::::::::::::

अचूक व वेळेत पीकपाणी नोंदणीसाठी हे ॲप शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. यावर नोंदणी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना व शेती संबंधातील विविध घटकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे नियोजित वेळेत शेतकऱ्यांनी आपले पीकपाणी नोंदवून सहकार्य करावे.

- जगदीश निंबाळकर, तहसीलदार, माळशिरस

Web Title: Bhausaheb started appearing in the field, busy in mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.