शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणप्रेमी भातवाले मामांनी जिल्हा परिषद शाळेत फुलवली वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:03 IST

मोडनिंब येथील मुलींची शाळा; पोषण आहार देणाºया युवकाची कमाल

ठळक मुद्देविजय परबत या युवकाला शाळेतील सर्व विद्यार्थिनी भातवाले मामा या नावाने ओळखतात गेल्या दोन महिन्यांपासून तो रोज शाळेत येऊन झाडांना पाणी देण्याचे काम

मोडनिंब : मे महिना सुरू... उन्हाची तीव्रता वाढलेली...शाळांना सुट्टी़...त्यामुळे शाळेकडे कोणी फिरकतही नाही़ त्यामुळे शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांनी प्रांगणात लावलेली झाडे उन्हाळ्यात करपून जातात़ पण मोडनिंब झेडपी शाळेतील शालेय पोषण आहार पुरवणाºया विजय परबत (भातवाले मामा) या तरुणाने रोज शाळेत येऊन परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या सर्व झाडांना पाणी देऊन शाळेत वनराई फुलवली.

मोडनिंब येथील झेडपी मुलींच्या शाळेच्या पटांगणात तीन वर्षांपूर्वी विशाल मेहता यांनी लहान रोपे दिली होती, ती आता मोठी झाली आहेत़ त्यांना उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता होती़ ते काम विजय परबत हे दररोज करतात.

प्रत्येक शाळेमध्ये वर्षभरात विविध कार्यक्रमांदरम्यान वृक्षारोपण होते़ पण उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर ती झाडे शाळेच्या आवारात दिसतीलच असे नाही़ मात्र मोडनिंब येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये मुलींना भात वाटप करणारे व शालेय पोषण आहार पुरवणाºया विजय परबत या युवकाने ना कोणाकडून मानधन घेतले, ना कोणता भत्ता शिवाय हे कर म्हणूनही त्याला कोणी सांगितलेले नाही़ तरीही गेल्या दोन महिन्यांपासून तो रोज शाळेत येऊन झाडांना पाणी देण्याचे काम करीत आहे.

झाडे हिरवी झाल्याचा मनस्वी आनंद- विजय परबत या युवकाला शाळेतील सर्व विद्यार्थिनी भातवाले मामा या नावाने ओळखतात़ शाळेची मधली सुट्टी झाली रे झाली, मुलींना रोज गरमागरम शालेय पोषण आहार देतो़ एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांमुळे आपल्याला चार पैसे मानधन म्हणून मिळतात, तेथील शाळेचा परिसर स्वच्छ व हरित दिसला पाहिजे, अशी मनाशी खूणगाठ बांधून शाळेसमोर लावलेली चिंच, वड, पिंपळ, करंजा, सप्तपर्णी यांसह अन्य सर्व झाडांना दररोज शाळेचे गेट उघडून दोन ते तीन तास पाणी देतो़ त्यामुळे उन्हाळ्यातही ही झाडे हिरवीगार दिसत आहेत़ त्याचा मनस्वी आनंद आहे, असे विजय परबत या युवकाने सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षण