भाजपा मोहोळ तालुका उपाध्यक्षपदी भगरे, लेंगरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:52+5:302021-08-21T04:26:52+5:30
कुरुल : मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी अंकोली येथील माऊली नागनाथ भगरे व मोहोळचे सागर अनंत लेंगरे ...

भाजपा मोहोळ तालुका उपाध्यक्षपदी भगरे, लेंगरे
कुरुल : मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी अंकोली येथील माऊली नागनाथ भगरे व मोहोळचे सागर अनंत लेंगरे या दोघांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, उपाध्यक्ष पांडुरंग बचुटे, सरचिटणीस बाळासाहेब पवार, माऊली जगताप, मधुकर सिरसट, सरचिटणीस सतीश पाटील, महेश सोवनी, भैरवनाथ यात्रा समितीचे चेअरमन अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य धनंजय अवताडे, मुजीब मुजावर, भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी सिद्धेश्वर बरडे, हनुमंत गवळी, सुभाष यादव, जितेंद्र इंगळे, देवानंद भगरे, भारत पवार, भारत भंडारे, पंडित घाडगे, अण्णासाहेब पवार, अमोल चव्हाण, औदुंबर वाघमोडे, द्रोणा लेंगरे, प्रशांत लेंगरे उपस्थित होते.
-------
फोटो : २० माऊली भगरे