भांबुर्डी गणात कोणाची शिजणार डाळ!
By Admin | Updated: January 24, 2017 19:59 IST2017-01-24T19:59:38+5:302017-01-24T19:59:38+5:30
भांबुर्डी गणात कोणाची शिजणार डाळ!

भांबुर्डी गणात कोणाची शिजणार डाळ!
भांबुर्डी गणात कोणाची शिजणार डाळ!
माळशिरस : तालुक्यातील भांबुर्डी या नव्याने स्थापना झालेल्या गणाची ही पहिली निवडणूक आहे. पूर्वी यातील अनेक गावे मेडद गणाला व माळशिरस गटाला जोडली होती. माळशिरस नगरपंचायत झाल्यामुळे फेररचनेत भांबुर्डी गण तयार झाला. त्यामुळे राजकीय समीकरणे बदललेली आहेत. अनेक राजकीय पक्षांनी आपल्या वेगळ्या चुली मांडायला सुरुवात केली असली तरी यात कोणाची डाळ शिजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भांबुर्डी गणात भांबुर्डीसह मोटेवाडी, जाधववाडी, सदाशिवनगर, तामशिदवाडी, पुरंदावडे, येळीव या गावांचा समावेश आहे़ हा गण मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे़ त्यामुळे सर्व पक्षांनी आता उमेदवाराची शोधमोहीम हाती घेतल्याचे चित्र आहे. भांबुर्डी किंवा सदाशिवनगर या दोन गावातील उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे.
या गणातील अनेक गावे मोहिते-पाटील विरोधकांची मानली जातात. पूर्वीच्या मेडद गणात आघाडीची कायम बाजी होती. यामुळे याही वेळी आपला विजय निश्चित होणार, अशी धारणा ठेवून मोहिते-पाटील विरोधकांचे काम सुरू आहे़ असे असले तरी यावेळी गावांच्या अदलाबदली झाल्या आहेत़ त्यात मागील जि़ प़ निवडणुकीत मताधिक्यात घट झालेली आहे़ मतदारांच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत विकासकामांचा आलेख, उमेदवाराची लोकप्रियता, गटातटातील राजकारण यावर पारंपरिक विजय मिळविण्यासाठी ‘काटे की टक्कर’ द्यावी लागणार आहे.
-------------------------
‘युज अॅण्ड थ्रू’ची वागणूक
या गणातीत सर्वांत मोठी समस्या म्हणजे प्रत्येक गावातील अंतर्गत रस्ते व मुख्य गावांना जोडणारे रस्ते होय़ मग यात सदाशिवनगर, इस्लामपूर, भांब, गिरवी, नातेपुतेसह अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ तालुक्यात वर्षानुवर्षे राष्ट्रवादी मोठी ताकद आहे़ राज्यात सत्ता होती, तरीही तालुक्याचा पश्चिम भाग विकासापासून कोसो दूर आहे़ कारण या भागातील विविध समस्यांचे गाठोडे बघायला कोणच राजी नसल्याची खंत नागरिक बोलून दाखवित आहेत़ या भागाला सर्वच पक्षांनी ‘युज अॅन्ड थ्रु’ अशीच वागणूक दिली आहे़