शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! बर्ड फ्ल्यूमुळं प्रशासन अलर्ट; पोल्ट्री शॉपमध्येही सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 14:34 IST

प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सोलापूर : सोलापुरातील कावळे, घार अन् बगळ्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळं झाल्याचं भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसिज लॅबोरेटरीने स्पष्ट केल्यानंतर दोन्ही सिद्धेश्वर तलाव आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तलाव परिसरात सतर्कता बाळगण्यात येत असून, तिथे नागरिकांना येण्यास प्रतिबंध केला आहे. दरम्यान, दिवसभरात पशुवैद्यकीय विभाग, महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून मृत पक्षी एकत्र केले.

भविष्यात बर्ड फ्ल्यूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्ला बाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दहा किलोमीटर त्रिजेतील क्षेत्र हा सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. शहरातील दोन्ही बाधित परिसर सोडियम हायपोक्लोराइड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट यांचा वापर करून निर्जतुकीकरण करण्यात येत आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मृत पक्ष्यांची अशी लावणार विल्हेवाटपशुसंवर्धन विभागाने आजारी पक्ष्यांचे नमुने व मृत पक्षी तत्काळ तपासणीसाठी पाठवावेत. त्याचा अहवाल प्राप्त करून घ्यावा, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी किमान तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर व पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करण्यात यावी. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरवण्यास आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पोल्ट्री शॉप सर्वेक्षण; चालकांची तपासणीदोन्ही परिसर महानगरपालिका प्रशासन यांच्यामार्फत निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा भाग लोकांच्या रहदारीसाठी प्रतिबंधित केला आहे. या भागात तशा पद्धतीचे बॅनर लावण्यात आले आहेत. आरोग्य विभागामार्फत पोल्ट्री शॉपचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शॉपचालक आजारी आहे का? तसेच त्यांच्याकडे आढळणाऱ्या कोंबड्या व कोंबडीजन्य उत्पादने यांची माहिती जमा करण्यात येत आहे.

दहा पथके घेणार पाळीव पक्ष्यांचे नमुनेदोन्ही बाधित क्षेत्रामध्ये पशुसंवर्धन विभागाची किमान दहा पथके तयार करण्यात आली आहेत. एक किलोमीटर परिसरातील पाळीव व इतर पक्ष्यांचे सर्वेक्षण केले जात आहे तसेच दहा किलोमीटरचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. या भागातील नमुने रँडम पद्धतीने काढून पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, वनविभाग, जलसंपदा विभाग व परिवहन विभाग यांना आवश्यक म्हणून मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवठा करण्याबाबत सांगण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBird Fluबर्ड फ्लू