शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान; सोलापूर ‘लोकमत’संगे शेकडो डॉक्टर्स-नागरिक रस्त्यावर ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:42 IST

लोकमत सखी मंच अन् स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेच्या रॅलीत विविध संस्था सहभागी

ठळक मुद्देमानवी साखळी निर्माण करून मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. ‘मुलांना माणूस म्हणून वाढवा- वेलणकर

सोलापूर: समाजात मुलगा-मुलगी या लिंगभेदाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकमत सखी मंच व स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी २ जानेवारीला सेवासदन प्रशालेत (वॉक फॉर कॉझ) ‘बेटी बचाओ, बेटी  पढाओ’ जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या जनजागरणासाठी शेकडो डॉक्सर्स आणि नागरिकांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

व्यासपीठावर महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महापौर शोभा बनशेट्टी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी दबडे, सचिव डॉ. प्रतिभा बलदवा, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर, सेवासदन संस्थेचे सहसचिव केदार केसकर यांची उपस्थिती होती.

उपस्थित शेकडो विद्यार्थ्यानींना संबोधित करताना मधुरा वेलणकर यांनी पालकांना लिंगभेद करण्यापासून परावृत्त करण्यासाठी काही कानमंत्रही दिले. प्रास्ताविकेतून डॉ. माधुरी दबडे यांनी जनजागृती रॅलीचा उद्देश विशद केला. महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्वत:ला मुली असल्याचा अभिमान व्यक्त केला. लिंगभेदाची ही भावना जनतेने दूर करून समानतेची भावना समाजात रुजायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सेवासदन शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्या वंदना जोशी, मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर, नीता बोळकवठेकर, रोटरी क्लब इलाईटचे अध्यक्ष राजन वोरा, लायन्स क्लब आॅफ मिडटाऊनचे माजी अध्यक्ष डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, रोटरी क्लब आॅफ नॉर्थच्या अध्यक्षा वंदना कोपकर, अपूर्व महिला मंडळ, स्त्री सखी मंडळ, अश्विनी हॉस्पिटल नर्सिंग कॉलेज, इनरव्हील क्लब, दमाणी प्रशाला, प्रीती केटरर्स आदींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. गौरी कहाते यांनी केले. 

‘मुलांना माणूस म्हणून वाढवा- वेलणकरमुलगा म्हणजे वंशाचा दिवा किंवा मुलगी म्हणजे प्रकाश देणारी पणती, असे पारंपरिक शब्द वापरून लिंगभेद न करता आपण आपल्या मुलांना माणूस म्हणून वाढवलं तर नक्कीच त्यांचं जीवन प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना उपस्थित विद्यार्थिनींना उद्देशून त्यांनी ‘आपण खूप नशीबवान आहात, कारण तुम्ही या ठिकाणी अस्तित्वात आहात, म्हणून समोर बसलेल्या मुलींनो जीवन खूप सुंदर आहे, त्याचा खºया अर्थानं आस्वाद घ्या अन् आपल्या स्वप्नांना नवे पंख देऊन प्रगती साधावी, असे आवाहन प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती- यावेळी सेवासदन प्रशालेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी लिंगभेदावर आधारित लघुनाटिका सादर केली. या बालचमूंनी आपल्या अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवत प्रबोधनाचा संदेश दिला. यावेळी मुलींना समान हक्क देण्याविषयीची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली.

शहरे स्मार्ट झाली, मुलींनो स्मार्ट व्हा!- महापालिका आयुक्त डॉ. ढाकणे भाषणात म्हणाले की, समाजात मुलींचं योगदान मोलाचं आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. शहरे स्मार्ट होताहेत, मुलींनो आपणही आता स्मार्ट व्हायला पाहिजे. लोकमत आणि वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींच्या पुढाकारातून घेण्यात आलेला हा उपक्रम नक्कीच दिशादर्शक ठरेल. 

सेल्फी पॉर्इंटवर महिला वर्गाची गर्दी- या उपक्रमांतर्गत शहरातील लोकांना आपल्या मुलींसमवेतचा फोटो पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील काही  निवडक सेल्फींचा कार्यक्रम स्थळी असलेल्या प्रदर्शनात समावेश करण्यात आला. त्यावेळी आपली सेल्फी पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 

‘वॉक फॉर कॉज’ रॅलीने वेधले लक्ष- मुख्य कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सकाळी ९ वाजता लक्षवेधी रॅली काढण्यात आली. सेवासदन प्रशालेपासून सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासह महिला मंडळांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही रॅली सेवासदन प्रशालेपासून सरस्वती चौक, लकी चौक, किल्ला बागमार्गे चार हुतात्मा पुतळ्याजवळ विसर्जन झाले. तत्पूर्वी चार हुतात्म्यांना आणि अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मानवी साखळी निर्माण करून मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटMadhura Velankar-Satamमधुरा वेलणकरchildren's dayबालदिन