Beraking; सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी होम क्वारंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 02:11 PM2020-08-07T14:11:46+5:302020-08-07T14:17:41+5:30

सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकाºयांना कोरोनाची लागण; शुक्रवारी आढळले नव्याने २९१ बाधित रूग्ण

Beraking; Solapur Zilla Parishad Health Officer Home Quarantine | Beraking; सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी होम क्वारंटाइन

Beraking; सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी होम क्वारंटाइन

Next
ठळक मुद्देग्रामीण भागात अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागात रॅपिड अँटिजेन किटद्वारे ५० हजार चाचण्या घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला दिले

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी होम क्वारंटाइन झाल्याचे प्रशासनातर्फे शुक्रवारी सांगण्यात आले.

ग्रामीण भागात शुक्रवारी नव्याने  २९१  कोरोना बाधित रुग्ण आढळले तर आठ जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास प्राप्त झाला़ जिल्हा आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात रॅपिड अँटिजेन किटद्वारे चाचण्या घेण्याचा २१ हजारांचा टप्पा पूर्ण केला असून, या मोहिमेत ९० टक्के लोकांना बाधा झाली नसल्याचे दिसून आले आहे. 

ग्रामीण भागात अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागात रॅपिड अँटिजेन किटद्वारे ५० हजार चाचण्या घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. त्याप्रमाणे आरोग्य विभागाने तालुकानिहाय मोहीम राबविली आहे. 

Web Title: Beraking; Solapur Zilla Parishad Health Officer Home Quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.