जालना येथील अपघातात बेंबळेची महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST2021-06-16T04:30:30+5:302021-06-16T04:30:30+5:30
अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी जालना शहराच्या अंबड चौकाजवळ हा अपघात झाला. जालन्यातील एका नातेवाइकाच्या लग्नाला जीमधून सर्व ...

जालना येथील अपघातात बेंबळेची महिला ठार
अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी जालना शहराच्या अंबड चौकाजवळ हा अपघात झाला. जालन्यातील एका नातेवाइकाच्या लग्नाला जीमधून सर्व जण निघाले होते. अपघातामध्ये स्वाती काळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. जखमींपैकी सोलंकरवाडी येथील ४, चांदज येथील २ व बेंबळे येथील २ असे एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्वाती काळे यांचा मुलगा सार्थक (वय १२) हादेखील गंभीर जखमी आहे.
मयत स्वाती अजय काळे या बेंबळे- टेंभुर्णी-कोंढारभाग परिसरातील धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते पोपट अण्णा काळे यांच्या सूनबाई आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, सासू ,सासरे, दीर, पती व दोन मुले असा मोठा परिवार आहे.