गुडेवारांच्या बदलीमुळे ‘त्या’ फाईल जागेवरच थांबल्या

By Admin | Updated: June 26, 2014 01:17 IST2014-06-26T01:17:23+5:302014-06-26T01:17:23+5:30

फाईल दाबून ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा

Because of Gudewar's transfer, the 'file' stopped at the place | गुडेवारांच्या बदलीमुळे ‘त्या’ फाईल जागेवरच थांबल्या

गुडेवारांच्या बदलीमुळे ‘त्या’ फाईल जागेवरच थांबल्या


सोलापूर: चौकशी होऊन कारवाई प्रस्तावित झालेल्या फाईल दाबून ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन सोमवारपर्यंत फाईल सादर करण्याची मुदत दिली होती, परंतु प्रभारी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याने सोमवारी एकही फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे आली नसल्याचे सांगण्यात आले.
१२ जून रोजी प्रभारी सीईओ म्हणून पदभार घेतल्यानंतर गुडेवार यांनी कामाचा धडाका लावला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तत्पर सेवा बजावा, मुख्यालयात राहा अशा सूचना दिल्या होत्या. खातेप्रमुखांना दररोज फाईल निकाली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. ते स्वत:ही सकाळी आलेली फाईल दुपारी त्या-त्या विभागाकडे निर्णय घेऊन पाठवीत होते. विविध कारणांमुळे चौकशी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित केलेल्या फाईल कार्यवाहीसाठी पुढे पाठविण्याऐवजी दाबून ठेवण्यात आल्या होत्या. फाईल दाबून ठेवणाऱ्या बांधकाम, आरोग्य, अर्थ, शिक्षण, ग्रामपंचायत विभागाच्या संबंधित लिपिक व अधीक्षकांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यांना या फाईल सोमवारपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारपासून गुडेवार यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली. शनिवारी स्वत: गुडेवार यांनीच बदली झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्वपदावर आले.

Web Title: Because of Gudewar's transfer, the 'file' stopped at the place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.