सामाईक जमीन मोजणीवरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:21 IST2021-05-15T04:21:11+5:302021-05-15T04:21:11+5:30

सांगोला : सामाईक जमीन मोजणीच्या वादातून संतापलेल्या पाच जणांनी मिळून लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी पुतण्याला मारहाण करून जखमी केले. ...

Beatings from common land counts | सामाईक जमीन मोजणीवरून मारहाण

सामाईक जमीन मोजणीवरून मारहाण

सांगोला : सामाईक जमीन मोजणीच्या वादातून संतापलेल्या पाच जणांनी मिळून लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी पुतण्याला मारहाण करून जखमी केले. तसेच त्याच्या पत्नीस दमदाटी करीत घरासमोर बांधलेल्या जनावरांच्या दोऱ्या सोडून पीव्हीसी पाइप फोडल्याचा प्रकार कडलास येथे घडला.

१३ मे रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान कडलास येथे ही घटना घडली. याबाबत रामचंद्र मुरलीधर जाधव (रा. कडलास) यांनी फिर्याद दिली सांगोला पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कडलास (ता. सांगोला) येथील रामचंद्र मुरलीधर जाधव आणि चुलत भाऊ विजय जाधव, चुलते शिवाजी जाधव यांच्यात सामाईक शेतीचा वाद असून पोट हिश्याची मोजणी करणे बाकी आहे. गुरुवार १३ मे रोजी सकाळी रामचंद्र जाधव शेतामध्ये शेणखत टाकत होते. दरम्यान, चुलत भाऊ सुजीत शिवाजी जाधव, पप्पू शिवाजी जाधव, सोनू पोपट जाधव हे त्या ठिकाणी आले. नांगरणीत बांध का पोखरला, असे विचारत दमदाटी करीत सुजीत जाधव याने लाकडी दांड्याने रामचंद्र यांना मारहाण केली. पप्पूने काठीने मारले. उषा जाधव, सुवर्णा जाधव यांनी रामचंद्र यांच्या पत्नी मीना यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. घरासमोर जनावरांच्या दोऱ्या सोडून तीन पीव्हीसी पाइप फोडले.

Web Title: Beatings from common land counts