बिरजू धुरा राम (रा. सैदपूर-मखदुमाबाद, बिहार) असे जखमी परप्रांतीय मजुराचे नाव आहे. बिहार राज्यातील ठेकेदार बिरजू मानरूप राम याने त्याच्यासमवेत छोटनदास (रा. अरवल) व बिरजू धुरा राम हे कामगार सांगोला-चांडोलेवाडी येथील हटसन दूध डेअरी पेंडीच्या कारखान्यामध्ये मोलमजुरीसाठी घेऊन आला आहे. दरम्यान, बिरजू धुरा राम व छोटनदास हे रविवारी होळी सणानिमित्त जेवण करून रूममध्ये झोपले होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास बिरजू धुरा राम झोपेत असताना त्याचा पाय छोटनदास यास लागला. त्याने तू मला मुद्दामच लाथ मारली असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करू लागला. यावेळी त्याने लोखंडी पाईपने बिरजू धुरा रामच्या डाव्या हाताच्या पोटरीवर, पाठीवर, डाव्या पायावर गंभीर मारून जखमी केले. तसेच बिरजू मानरूप राम यानेही त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तू येथे राहायचे नाही, असे म्हणून त्यास दमदाटी केली. याबाबत बिरजू धुरा राम याने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी परप्रांतीय ठेकेदारासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ठेकेदारासह कामगाराची एका कामगारास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST