पोलिसात तक्रार का केली म्हणून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:23 IST2021-04-09T04:23:39+5:302021-04-09T04:23:39+5:30

या प्रकरणी सोमनाथ बलभीम मस्कर (रा. वरकटणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आमच्या गावातील अनिल कदम याला आकाश जाधव, ...

Beating as to why he lodged a complaint with the police | पोलिसात तक्रार का केली म्हणून मारहाण

पोलिसात तक्रार का केली म्हणून मारहाण

या प्रकरणी सोमनाथ बलभीम मस्कर (रा. वरकटणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आमच्या गावातील अनिल कदम याला आकाश जाधव, प्रदीप जाधव, लखन माने यांनी मारहाण केली होती. त्याबाबत करमाळा पोलिसात तक्रार देण्यासाठी मी त्याच्याबरोबर गेलो होतो. याचा राग मनात धरून आकाश जाधव, प्रदीप जाधव, लखन माने, हर्षद माने व आकाश जाधवचा लहान भाऊ अशा पाच जणांनी मला रस्त्यावर आडविले व तू अनिल कदम याच्याबरोबर पोलीस स्टेशनला का गेला असे म्हणून दुचाकीवरून खाली पाडून मारहाण केली. माझी आई कुंताबाई सोडविण्यास आली असता, तिलाही यांनी मारहाण केली. यावेळी तिचे गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Beating as to why he lodged a complaint with the police