शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

बांधावरील झाडीझुडपी तोडून जनावरांचा रस्ता बंद करणा-या मायलेकास मारहाण

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 27, 2023 20:27 IST

जनावरांचा येण्या -जाण्याचा रस्ता बंद करीत होते.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : शेतात बांधावरील काटेरी झाडी-झुडपी तोडून कोंबड्या व जनावरांच्या येण्या जाण्याचा रस्ता बंद करीत असताना शेजारील शेतक-यांसह चौघांनी मिळून मायलेकास शिवीगाळ दमदाटी करून कु-हाडीच्या पाठीमागील तुंब्याने लेकाच्या डाव्या व उजव्या पायावर मारून जखमी केले.  

ही घटना काल शुक्रवार, २६ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास (मेटकरवाडी, शिरभावी, ता. सांगोला) येथे घडली. याबाबत संतोष मोहन खांडेकर यांने फिर्याद दिली असून पोलिसांनी बिरा लवटे, हणमंत लवटे, इंदाबाई लवटे व कविता लवटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादी संतोष खांडेकर व बिरा लवटे यांची शेत जमीन एकमेकाशेजारी बांधास लागून आहे. दरम्यान बिरा लवटे यांच्या कोंबड्या व जनावरे संतोष खांडेकर यांच्या पिकात येऊन नुकसान करीत होते. म्हणून तो आणि त्याची आई सखुबाई खांडेकर शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या बांधास असणारी काटेरी झाडी-झुडपी कु-हाडीने तोडून त्यांच्या बांधावर टाकून कोंबड्या व जनावरांचा येण्या -जाण्याचा रस्ता बंद करीत होते.

दरम्यान दुपारी १२:३० च्या सुमारास शेजारी राहणा-या इंदाबाई लवटे यांनी त्या ठिकाणी येऊन मायलेकास शिवीगाळ करीत हा बांध आमचा आहे म्हणत बिरा लवटे हणमंत लवटे, कविता लवटे शिवीगाळ दमदाटी केली. यावेळी बिरा लवटे याने संतोषच्या हातातील कु-हाड हिसकावून कु-हाडीच्या तुंब्याने त्याच्या उजव्या व डाव्या पायावर मारून जखमी केले. हनुमंत लवटे याने त्यास खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर