सोलापूर : घराचे डिपॉझिट परत मागितल्याने मारहाण, दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By दिपक दुपारगुडे | Updated: May 4, 2023 18:17 IST2023-05-04T18:17:11+5:302023-05-04T18:17:24+5:30
याप्रकरणी दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर : घराचे डिपॉझिट परत मागितल्याने मारहाण, दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापूर : घर भाडेपोटी दिलेले दहा हजार रुपयांचे डिपॉझिट रक्कम परत मागितल्याच्या कारणावरून दोघांनी मारहाण केल्याची घटना १ मे रोजी रात्री १०.३० वाजता तोळनूर येथे घडली. याप्रकरणी दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत व्हनप्पा अर्जुन जमादार यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार तोळणूर (ता. अक्कलकोट) एसटीस्टॅंड चौकात दत्त हॉटेल जवळ फिर्यादी जमादार व आरोपी चनप्पा प्रभु रब्बा (रा. तोळणूर, ता. अक्कलकोट) यांची भेट झाली. या भेटीत जमादार यांनी घरभाडे डिपॉझीट म्हणून दिलेले दहा हजार रुपये परत मागितले.
यावरून चिडून जाऊन चनप्पा प्रभु रब्बा व त्याचा मित्र पिंटू आपण्णा कुसगल (दोघे रा. तोळणूर, ता. अक्कलकोट) या दोघांनी फिर्यादीस शिवीगाळी, दमदाटी करत शेजारीच पडलेली लोखंडी सळईने त्याच्या डोकीत मारुन जखमी केले. पिंटू कुसलग याने छाती व पोटात लाथाबुक्क्या मारुन जखमी केले. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गोटे हे करीत आहेत.