एकाला मारहाण ; बारा जणांविरूद्ध फिर्याद दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:42+5:302021-06-09T04:27:42+5:30

घेरडी येथील सुरेश बुरुंगले हा शनिवारी कय्युम आतार व आप्पासो सरगर यांच्याशी बोलत होता. त्यावेळी प्रकाश कोळेकर, सचिन केसकर ...

Beating one; Filed a lawsuit against twelve people | एकाला मारहाण ; बारा जणांविरूद्ध फिर्याद दाखल

एकाला मारहाण ; बारा जणांविरूद्ध फिर्याद दाखल

घेरडी येथील सुरेश बुरुंगले हा शनिवारी कय्युम आतार व आप्पासो सरगर यांच्याशी बोलत होता. त्यावेळी प्रकाश कोळेकर, सचिन केसकर व जयवंत गोरड या तिघांनी तेथे येऊन सुरेश बुरुंगले यास मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळी करून निघून गेले. त्यानंतर तेथेच विठ्ठल कोळेकर, भाऊ कोळेकर, संदिपान यमगर, प्रकाश कोळेकर, मोहन कोळेकर, तानाजी गोरड, सचिन गोरड, जयवंत गोरड, सचिन केसकर, पोपट कोळेकर, अंकुश कोळेकर, सचिन यमगर यांनी तू प्रकाश कोळकर यास का बोलला, तुला लय मस्ती आली आहे म्हणून विठ्ठल कोळेकर यांनी सायकलच्या चेनने सुरेश बुरुंगले यास मारहाण केली. भाऊ कोळेकर याने कुऱ्हाडीच्या तुंब्याने डोक्यात मारून जखमी केले. तर संदिपान यमगर व प्रकाश कोळेकर यांनी लोखंडी गजाने मारहाण केली. त्यांचे भांडण कय्युम आत्तार, आप्पासो यमगर, अमोल गुटुकडे यांनी सोडविले. याबाबत सुरेश बुरुंगले यांनी त्या १२ जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Beating one; Filed a lawsuit against twelve people