दुचाकीला कट मारल्याची विचारणा करणाऱ्या मामा-भाच्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST2021-06-10T04:16:32+5:302021-06-10T04:16:32+5:30

यावेळी आई त्यांना समजावून सांगण्यासाठी केली असता त्यांनी तिलाही शिवीगाळ, दमदाटी केली. ही घटना ८ जून रोजी रात्री ...

Beating mama-nieces who ask to cut the bike | दुचाकीला कट मारल्याची विचारणा करणाऱ्या मामा-भाच्यांना मारहाण

दुचाकीला कट मारल्याची विचारणा करणाऱ्या मामा-भाच्यांना मारहाण

यावेळी आई त्यांना समजावून सांगण्यासाठी केली असता त्यांनी तिलाही शिवीगाळ, दमदाटी केली. ही घटना ८ जून रोजी रात्री ८ च्या सुमारास वाढेगाव (ता. सांगोला) येथे घडली.

वाढेगाव येथील अतुल गोरख माने यांचा भाचा अजय डावरे हा मंगळवारी लेंडवे किराणा दुकानासमोरील रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्यावेळी अल्ताफ मुलाणी याने दुचाकीवरून येऊन त्याला कट मारून निघून गेला. घडला प्रकार भाचा अजयने मामा अतुल माने यास सांगितला. त्यानंतर मामा-भाचा दोघे मिळून जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी अल्ताफने दोघांना शिवीगाळ केली. यानंतर उमेश माने यांच्या घरासमोर अल्ताफ मुलाणी, गणेश दिघे, पांडुरंग दिघे, प्रशांत गायकवाड, बबलू चौगुले यांनी चाकूच्या पाठीमागील मूठ अतुल माने यांच्या डोक्यात मारून जखमी केले, तर उर्वरित चौघांनी मामा-भाच्यास हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याची फिर्याद अतुल माने यांनी दिली आहे.

Web Title: Beating mama-nieces who ask to cut the bike